ruchi gupta.
ruchi gupta. 
देश

सोनिया गांधी यांच्या बैठकीआधी NSUIच्या प्रभारीचा राजीनामा; सांगितलं कारण

सकाळ ऑनलाईन

नवी दिल्ली- काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षाचा परिणाम पक्षाशी संबंधीत संघटनांवरही पडत असल्याचं दिसतंय. काँग्रेसचे संघटन महासचिव केसी वेणुगोपाल यांच्यावर निशाना साधत पक्षाची विद्यार्थी संघटना एनएसयूआयच्या प्रभारी रुची गुप्ता यांनी राजीनामा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या राष्ट्रीय संयुक्त सचिव रुची गुप्ता यांनी एनएसयूआयमध्ये संघटनात्मक फेरबदलासाठी होत असलेल्या विलंबामुळे राजीनामा देत असल्याचं सांगितलं आहे. गुप्ता यांनी ट्विटरवरुन आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. 

AusvsIND 1st Test Day 3: कांगारुंनी तिसऱ्याच दिवशी टीम इंडियाचा खेळ केला खल्लास...

मी राजीनामा दिला आहे. सगळ्यांनाच माहिती आहे, की गेल्या काही दिवसांपासून संघटनेमधील अंतर्गत बदल खूप काळापासून प्रलंबित आहेत. संघटन महासचिवांकडून होणाऱ्या या विलंबामुळे संघटनेचे मोठे नुकसान होत आहे. वारंवार काँग्रेस अध्यक्षांकडे ही गोष्ट घेऊन जाणे सध्याच्या परिस्थितीत शक्य नाही, असं रुची गुप्ता आपल्या राजीनामा पत्रात म्हणाल्या आहेत. 

सोनिया गांधींनी वरिष्ठ नेत्यांसोबत घेतली बैठक

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्याच दिवशी रुची गुप्ता यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीमध्ये पक्षातील नाराज नेतेही उपस्थिती राहणार आहेत. या नेत्यांनी पक्ष संघटनेत मोठ्या फेरबदलाची मागणी करत काही दिवसांपूर्वी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. 

जीवे मारण्याची धमकी मिळतेय म्हणत पुन्हा ढसाढसा रडले 'बाबा का ढाबा'...

बैठकीत महासचिव केसी वेणुगोपाल राहणार नाहीत उपस्थित

महत्वाची गोष्ट म्हणजे सोनिया गांधी यांनी बोलवलेल्या बैठकीत महासचिव केसी वेणुगोपाल सामील होणार नाहीत. दुसरीकडे एनएसयूआयच्या प्रभारी रुची गुप्ता यांनी राजीनामा देऊ पक्षाअंतर्गत वाद टोकाचे असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. काँग्रेसच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार येत्या काही दिवसात रुची गुप्ता यांना डच्चू मिळणार होता. पण, गुप्ता यांनी अचानक दिलेला राजीनामा आणि त्यासाठी निवडलेली टायमिंग यामुळे पक्षातील लोक हैराण आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT