Congres_20flag
Congres_20flag 
देश

काँग्रेसकडून यू-ट्यूब चॅनल लाँच; भाजपचं पितळ उघडं पाडण्याचा निर्धार!

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- काँग्रेसने बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्वत:चे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म INC TV  यूट्यूबरवर लाँच केलं आहे.  मेन स्ट्रिम मीडिया पक्षपाती राहिला असल्याची टीका काँग्रेसने वारंवार केली आहे. त्यामुळे काँग्रेसची विचारधारा आणि काम जनतेपर्यंत थेट पोहोचवण्यासाठी यूट्यूबर एका चॅनलची सुरुवात केली आहे. काँग्रेसचा संदेश INC TV च्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवला जाईल असं सांगण्यात आलंय. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. भारतीय जनता पक्षाचे यापूर्वीपासूनच यूट्यूबवर चॅनेल आहे, ज्याचे 36 लाखांपेक्षा अधिक सबस्क्रिबशन्स आहेत. काँग्रसच्या मुख्यालयात बोलताना रणदीप सुरजेवाला यांनी सांगितलं की, INC TV यूट्यूब चॅनल 24 एप्रिलपासून ऑन एअर होईल. राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त याचा शुभारंभ केला जाईल. दिवसातील किमान 8 तास हे यूट्यूब चॅनल लाईव्ह असेल. यूट्यूबच्या लाँचिंगवेळी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी मल्लीकार्जुन खरगे, NSUI अध्यक्ष निरज कुंदन आणि महिला काँग्रेस अध्यक्ष सुष्मिता देव उपस्थित होत्या. 

पत्रकार परिषदेत बोलताना मल्लीकार्जुन खरगे म्हणाले की, ''डॉ. बाबासाहेबांनाही वाटायचं की भारतात पत्रकारिता म्हणजे व्यवसाय झाला आहे आणि भाजप त्यांचा विश्वास खरं ठरवताना दिसत आहे. भाजपच्या शासन काळात दलितांवर अत्याचार वाढले आहे. दर 11 मिनिटाला देशात दलितांवर हल्ले होत आहेत.'' खरगे पुढे म्हणाले की, देशात सत्य लपवण्याचा प्रयत्न होतोय. देशाला सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे. काँग्रेस INC TV च्या माध्यमातून हेच सत्य समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. 

दरम्यान, भाजपप्रमाणे काँग्रेस सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत नाही, अशी टीका केली जाते. त्याचमुळे काँग्रेसने सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरु केल्याचं दिसत आहे. काँग्रेसने फेब्रुवारीमध्ये ‘Join Congress Social media’  कॅम्पेन सुरु केले होते. गेल्या काही काळापासून काँग्रेसचा सोशल मीडियावरील वावर वाढला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Pakistan Team coach : मोठी बातमी! भारताला World Cup मिळवून देणारा गुरू बनला पाकिस्तानचा कोच, PCB ने दिले अपडेट

'काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केला, प्रकाश आंबेडकरांना सोडून दिलं'; बावनकुळेंचा जोरदार प्रहार

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : अभिनेता साहिल खानला दोन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT