Senior Congress leader Ahmed Patel 
देश

काँग्रेस नेते अहमद पटेल यांचे निधन; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास

सकाळ ऑनलाईन टीम

काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते अहमद पटेल यांचे निधन झाले आहे. महिन्याभरापूर्वी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. बुधवारी सकाळी 3 वाजून 30 मिनिटांनी अहमद पटेल यांनी गुरुग्राम येथील रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा फैजल यांनी वडिलांच्या मृत्यूची माहिती दिली आहे.  

अहमद पटेल  71 वर्षांचे होते.  काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेत्याच्या निधनावर पक्षाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी , यांनी ट्विटच्या माध्यमातून शोक व्यक्तकेलाय. अहमद पटेल हे पक्षाचा मजबूत स्तंभ होते. सर्वात कठिण काळात ते पक्षासोबत उभे राहिले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुखात आम्ही सहभागी आहोत, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.  

पटेल यांचे चिरंजीव फैसल पटेल आणि मुलगी मुमताज सिद्दीकी यांनी ट्विटरच्या माध्यमातून वडिलांच्या निधनासंदर्भातील माहिती दिली. बुधवारी पहाटे 3.30 वाजता रुग्णालयातच अहमद पटेल यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे त्यांनी सांगितले. एक महिन्यांपूर्वी अहमद पटेल यांना कोरोनाची बाधा झाली होती. उपचारादरम्यान त्यांची तब्येत बिघडत गेली. असा उल्लेखही फैसल आणि मुमताज यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ...तर राजकारण सोडून देईन, अरविंद केजरीवाल यांचे दिल्लीतील जंतरमंतरवरून आव्हान

AI in Army : आता 'फौजी' बनणार AI! सॅम ऑल्टमननी सैन्याशी केली हातमिळवणी, नेमकं तंत्रज्ञान काय? पाहा

Latest Marathi News Update : कांद्याला कवडीमोल भाव; विंचूरमध्ये स्वाभिमानीचा ‘रस्ता रोको’

Satara Robbery: कामावरून काढलं अन् टाकला दराेडा! अंगडिया कर्मचाऱ्याकडून लुटले ३२ लाखांचे दागिने, साताऱ्यातील दराेड्याप्रकरणी नेमकं काय घडलं..

IPL 2026 वर नवं संकट, स्पर्धा आधीच दोन दिवस पुढे ढकलावी लागतेय, त्यात आता रद्द होतेय की काय ही भीती... नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT