Sharad Pawar 
देश

Sharad Pawar : "वैयक्तिक स्वार्थासाठी हुकूमशाही सत्तेचे गुणगान" ; पवारांच्या भूमिकेवर काँग्रेस संतप्त

Sandip Kapde

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी अदानी प्रकरणाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राजकारण तापले आहे. आता काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. शरद पवार यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत देखील बिघाडी होणार असल्याची राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

अलका लांबा म्हणाल्या, "आज फक्त घाबरलेले, लोभी लोक त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी हुकूमशाही सत्तेचे गुणगान गात आहेत. एकटे राहुल गांधी देशातील जनतेची लढाई लढत आहेत. चोरांपासून भांडवलदार आणि चोरांना संरक्षण देणाऱ्या चौकीदाराविरुद्ध राहुल गांधी लढत आहेत'

अदानी समूहावरील आरोपांच्या जेपीसी चौकशीच्या विरोधात नाही, परंतु या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाची समिती अधिक योग्य आणि प्रभावी ठरेल, असे शरद पवार म्हणाले होते. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी अदानी समूहाचा बचाव केला आणि हिंडेनबर्ग संशोधन अहवालाच्या आधारे तयार केल्या जात असलेल्या टिकेवर देखील भाष्य केले.

काय म्हणाले शरद पवार?

संसदेत संख्याबळ पाहता जेपीसीमध्ये २१ सदस्य असतील तर सत्ताधारी पक्षाचे १५ आणि विरोधी पक्षांचे सहा सदस्य असतील, त्यामुळे समितीवर शंका निर्माण होईल, असे पवार म्हणाले होते. मी जेपीसीच्या विरोधात नाही. जेपीसी अनेक वेळा स्थापन झाल्या आहेत आणि मी काही जेपीसीचा अध्यक्ष आहे. बहुमताच्या आधारावर (संसदेत) JPC ची स्थापना केली जाईल. JPC ऐवजी सर्वोच्च न्यायालयाची समिती अधिक योग्य आणि प्रभावी ठरेल असे माझे मत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT