congress leader asked union minister smriti irani about rising oil gad cylinder prices video Sakal
देश

Video : इंधन दरवाढीबाबत स्मृती इराणींना जेव्हा काँग्रेस नेत्याने घेरलं..

सकाळ डिजिटल टीम

काही दिवसांपूर्वी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर पार पडल्यानंतर पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. याचा परिणाम खाद्यपदार्थांसह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवरही झाला आहे.

लोकांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन वस्तू खरेदी कराव्या लागत आहेत. याबाबत विरोधकांकडून सातत्याने सरकारला धारेवर धरले जात आहे. या दरम्यान, काँग्रेस नेत्या नेट्टा डिसूझा आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची आमने-सामने भेट झाली. यावेळी त्या केंद्रीय मंत्र्यांना तेलाच्या वाढत्या किमतींबाबत प्रश्न विचारताना दिसल्या. ही संपूर्ण घटना दिल्ली-गुवाहाटी फ्लाइटच्या प्रवासादरम्यान घडली.

त्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्या डिसूझा यांनी या घटनेचा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरु ट्विट केला. व्हिडिओमध्ये त्या फोनवरून संपूर्ण संभाषण रेकॉर्ड करताना दिसत आहेत. गुवाहाटीला जाताना मोदी सरकारमधील मंत्री स्मृती इराणी यांच्याशी सामना झाला, जेव्हा मी त्यांना एलपीजीच्या सतत वाढत चाललेलेल्या किमतींबद्दल विचारले तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं ऐका.. महागाईचं खापर त्यांनी कोण-कोणत्या गोष्टींवर फोडत आहेत. जनता प्रश्न विचारत आहे, स्मृतीजी टाळत आहेत. या व्हिडिओत मोदी सरकारची वास्तविकता नक्की पाहा असे त्यांनी व्हिडिओ ट्विट करताना लिहीलं आहे.

काँग्रेस नेता या इराणींना प्रश्न विचारत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान, त्या माझा मार्ग अडवत असल्याचे इराणीचे म्हणणे आहे. त्याचवेळी त्यांनी एलपीजीच्या कमतरतेबाबत प्रश्न केला असता त्या म्हणाल्या की, कृपया खोटे बोलू नका. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मात्र, गेल्या चार दिवसांपासून तेलाच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivdeep Lande contest Bihar Election: ‘सिंघम’ शिवदीप लांडे यांचीही आता बिहारच्या निवडणूक रिंगणात उडी; उमेदवारी अर्ज दाखल करणार!

EPFO New Option : 'ईपीएफओ' सदस्यांना मिळाला नवा पर्याय! आता 'PF' रक्कम पेन्शन खात्यात वळवता येणार

ब्रेकिंग! साहेबांच्या नावाने लाच मागणारा एजंट ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; मयताच्या भावाकडे, पत्नीकडे पीएफ, पेन्शन काढून देण्यासाठी मागितले २५००० रुपये

Ajit Pawar : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश

Supreme Court : मृत्युदंडाच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्रावर नाराजी

SCROLL FOR NEXT