Lok Sabha Election Esakal
देश

Lok Sabha Election: INDIA आघाडीला किती जागा मिळणार? काँग्रेस नेत्याने पहिल्यांदाच केला एवढा मोठा दावा

Lok Sabha Election: भाजप आणि मित्रपक्षांकडून वारंवारं मोदी 400 पार असं सांगण्यात येते मात्र विरोधकांकडून अद्याप याबाबत कोणतेही वक्तव्य समोर आले नव्हते दरम्यान, आता पहिल्यांदाच इंडिया आघाडीला किती जागा मिळतील यावर काँग्रेस नेत्याने विधान केले आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरू आहे. सात टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत असून आतापर्यंत चार टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. भाजप आणि मित्रपक्षांकडून वारंवारं मोदी 400 पार असं सांगण्यात येते मात्र विरोधकांकडून अद्याप याबाबत कोणतेही वक्तव्य समोर आले नव्हते दरम्यान, आता पहिल्यांदाच इंडिया आघाडीला किती जागा मिळतील यावर काँग्रेस नेत्याने विधान केले आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी इंडिया आघाडीला 350 जागा मिळतील आणि नवीन सरकार स्थापन होईल. त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष आशिष कुमार साहा यांनी हा दावा केला आहे. काँग्रेसने एवढा मोठा दावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी इंडिया आघाडीला 350 जागा मिळतील आणि नवीन सरकार स्थापन होईल. त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष आशिष कुमार साहा यांनी हा दावा केला आहे. काँग्रेससह कोणत्याही विरोधी पक्षाच्या नेत्याने एवढा मोठा दावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावेळी साहा म्हणाले की, 400 पार करण्याचा भाजपचा नारा पोकळ आहे.

वास्तविक इंडिया आघाडीला 350 जागा मिळतील आणि आम्ही नवीन सरकार स्थापन करू. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून परतणार नाहीत. इंडिया आघाडीला देशभरातून पाठिंबा मिळत आहे.

माध्यमांशी बोलताना साहा म्हणाले, 'भाजप चुकीची आश्वासने देऊन लोकांना मूर्ख बनवत आहे. ती आश्वासने पूर्ण करू शकलेली नाही. त्यामुळे हे सरकार घालवायचेच, असा निर्धार लोकांनी केला आहे. आता भारतात आघाडीचे सरकार स्थापन करायचे आहे. 350 जागांवर विजय मिळवून इंडिया आघाडी सरकार स्थापन होईल.

दरम्यान यावर भाष्य करताना भाजपचे प्रवक्ते नबेंदू भट्टाचार्जी म्हणाले की, यावेळी 400 पार करण्याचा नारा प्रत्यक्षात येईल कारण आम्हाला जनतेचा पाठिंबा आहे. इंडिया आघाडीचे नेते सत्तेत येण्याचे स्वप्न पाहत असतील तर आम्हाला काही अडचण नाही.

सीपीएम आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी त्रिपुरामध्ये आपले उमेदवार उभे केले आहेत. दोन्ही पक्ष राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडीसोबत आहेत. त्रिपुरामध्ये पूर्व त्रिपुरा आणि पश्चिम त्रिपुरा या दोन जागा आहेत. पश्चिम त्रिपुरा लोकसभा जागेसाठी आशिष साहा स्वतः रिंगणात असून त्यांची लढत राज्याचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांच्याशी आहे. तर पूर्व त्रिपुरामध्ये भाजप उमेदवार कृतीदेवी देबबर्मा आणि सीपीआयएमचे आमदार राजेंद्र रेआंग यांच्यात आहे. गेल्या वर्षी झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि सीपीएम एकत्र लढले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS बुशरा बानो कोण? इन्शाल्लाह म्हटल्यानं वाद, तक्रारीनंतर तडकाफडकी बदली

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Asian Games 2026: माशी शिंकली! भारतीय संघाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडूची माघार; IND vs AFG सामन्यात ४ षटकं फेकली अन्...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

SCROLL FOR NEXT