NEET-UG 2024 
देश

NEET-UG 2024 : नीट परीक्षेची सीबीआय चौकशी व्हावी; काँग्रेस नेते गौरव गोगोई यांची मागणी

वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीटच्या परीक्षेत अनेक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला जात आहे.

सकाळ वृत्तसेवा


नवी दिल्ली : नीट परीक्षेसाठी 24 लाख विद्यार्थ्य्यांनी कष्ट घेतले परंतु एनटीएमधील काही अधिकारी व पदाधिकार्यांच्या संगनमताने झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी सीबीआय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेतृत्वातील समितीने करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते खासदार गौरव गोगोई यांनी केली आहे.

वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीटच्या परीक्षेत अनेक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला जात आहे. या परीक्षेच्या विश्‍वासर्हयतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप करून खासदार गोगोई म्हणाले, वाढीव गुण देणे, लाखो पैसे देऊन पेपर फोडण्याचे काम झाले आहे. हे काम एनटीएमधील पदाधिकारी किंवा अधिकार या गैरव्यवहारात सामील असल्याशिवाय होऊ शकत नाही.

यामुळे देशातील 24 लाख युवकांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु या गैरव्यवहाराशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काहीही देणेघेणे नाही. निवडणुकीच्यापूर्वी त्यांनी परीक्षा पे चर्चा करून विद्यार्थ्यांना सल्ले दिले होते. आतामात्र ते नीटच्या गैरव्यवहारावर काहीही बोलले नाहीत. ते अभिनंदन स्वीकारण्यात व विदेश वारीत मश्गुल असल्याचा आरोपही खासदार गोगोई यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT