Congress Leader Jayram Ramesh On Elon Musk India Visit meeting pm Modi marathi news  
देश

Elon Musk India Visit : मावळत्या पंतप्रधानांची भेट घेणे मस्क यांनी टाळले; काँग्रेस नेत्याचा मोदींना टोला

पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार एलन मस्क भारतात येणार होते. यावेळी टेस्ला या इलेक्ट्रिक गाड्या तयार करण्याच्या संदर्भात काही करारही केंद्र सरकारसोबत करणार होते

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतात सध्या निवडणुकांसाठी मतदान सुरू असून या निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी या पदावर कायम राहणार नाही. यामुळे टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी आपला पूर्वनियोजित रद्द केला आहे, असा टोला काँग्रेसचे सरचिटणीस व खासदार जयराम रमेश यांनी हाणला आहे.

पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार एलन मस्क भारतात येणार होते. यावेळी टेस्ला या इलेक्ट्रिक गाड्या तयार करण्याच्या संदर्भात काही करारही केंद्र सरकारसोबत करणार होते. परंतु अचानक त्यांनी हा दौरा रद्द करून सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात हा दौरा होईल, असे सुचविले आहे. या रद्द झालेल्या दौऱ्यावरून काँग्रेसने भाजपला घेरण्याचा प्रयत्न चालविला आहे. पंतप्रधान मोदी हे मावळते पंतप्रधान असल्याची जाणीव एलन मस्क यांना झाल्यामुळे त्यांनी भारत दौरा रद्द केल्याचा दावा खासदार रमेश यांनी केला आहे. काँग्रेसचे धोरण विदेशातील गुंतवणूक वाढविण्यासाठी राहणार असून निवडणुकीनंतर सत्तेवर आल्यानंतर परकी गुंतवणुकीच्या वाढीसाठी काँग्रेस प्रयत्न करेल, असा दावाही त्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

SCROLL FOR NEXT