Congress leader Jignesh Mevani Sakal
देश

काँग्रेस नेते जिग्नेश मेवानी यांना अटक; आसाममध्ये गुन्हा दाखल

एफआयआरची प्रत अद्याप सादर करण्यात आलेली नसल्याचं त्यांच्या समर्थकांनी सांगितलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

गुजरातचे काँग्रेस नेते आणि वडगमचे आमदार जिग्नेश मेवानी यांना एका ट्वीटमुळे कोक्राझार पोलिसांनी अटक केली आहे. काल रात्री साडे अकराच्या सुमारास पालनपूर सर्किट हाऊस इथून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या समर्थकांनी या बातमीची पुष्टी केली आहे.

मेवानी यांच्या समर्थकांनी सांगितलं की पोलिसांनी जिग्नेश मेवानी यांच्या अटकेनंतर अद्याप एफआयरची प्रत दिलेली नाही. मेवानी यांना आता अहमदाबाद इथं नेण्यात येईल आणि तिथून पुढे आसाम पोलीस रेल्वेने त्यांना गुवाहाटीला नेतील. आसाममध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मेवानी यांच्या समर्थकांनी दिली आहे.

या अटकेच्या निषेधार्थ मेवानींचे समर्थक आज (२१ एप्रिल) दिल्लीत आंदोलन करणार आहेत. 'संविधान वाचवा, देश वाचवा' अशा घोषणाही या आंदोलनादरम्यान देण्यात येणार आहेत. गुजरात विधानसभा निवडणुका या वर्षाच्या अखेरीपर्यंत होणार आहेत. त्याआधीच मेवानी यांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT