Kapil Sibal on Congress Leadership esakal
देश

'गांधी परिवारानं काँग्रेसचं नेतृत्व सोडावं अन् दुसऱ्याला संधी द्यावी'

सकाळ डिजिटल टीम

'गांधी कुटुंबानं स्वेच्छेनं नेतृत्वापासून दूर रहावं आणि दुसऱ्याला संधी द्यावी.'

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी गांधी कुटुंबाला (Gandhi Family) पक्षाच्या नेतृत्वापासून दूर राहण्यास सांगितलंय. गांधी घराण्यानं काँग्रेसच्या नेतृत्वापासून दूर जावं आणि नेतृत्वाच्या भूमिकेसाठी दुसऱ्याला संधी द्यावी, असं ते म्हणाले. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) काँग्रेसचा (Congress) पराभव झाल्यानंतर आणि काँग्रेस कार्यकारिणीनं सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवल्यानंतर सिब्बल यांचं वक्तव्य समोर आलंय.

कपिल सिब्बल यांनी विचारमंथन सत्र आयोजित करण्याच्या पक्षाच्या निर्णयावर टीका केलीय. आठ वर्षांनंतरही पक्षाच्या पडझडीची कारणं कळत नसतील, तर नेतृत्व ‘कुकू लँड’मध्ये राहत असल्याचंही ते म्हणाले. G23 नेत्यांनी 2020 मध्ये सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याकडं पक्षात मोठे बदल करण्याची मागणी केली होती. गांधी घराण्यानं नवीन नेत्यासाठी मार्ग काढावा, अशी मागणी करणारे सिब्बल हे काँग्रेसचे पहिले ज्येष्ठ नेते आहेत.

ते पुढे म्हणाले, गांधी कुटुंबानं स्वेच्छेनं नेतृत्वापासून दूर रहावं आणि दुसऱ्याला संधी द्यावी. तसेच विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवामुळं किंवा सोनिया गांधींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवण्याच्या CWC च्या निर्णयामुळं मला आश्चर्य वाटलं नाही. आमच्यासारखं अनेक नेते सीडब्ल्यूसीमध्ये नाहीत, परंतु काँग्रेसचा दृष्टीकोन पूर्णपणे वेगळा आहे, असंही त्यांनी शेवटी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT