KCR esakal
देश

काँग्रेसच्या बड्या नेत्याचा केसीआर यांच्या 'बीआरएस' पक्षात प्रवेश

Congress Leader Joins BRS: काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या तेलंगणातील नेत्या पलवाई श्रावंती यांनी रविवारी एका समारंभात भारत राष्ट्र समितीमध्ये(बीआरएस) प्रवेश केला.

सकाळ डिजिटल टीम

Congress Leader Joins BRS: काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या तेलंगणातील नेत्या पलवाई श्रावंती यांनी रविवारी एका समारंभात भारत राष्ट्र समितीमध्ये(बीआरएस) प्रवेश केला. बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष के.टी. रामाराव हे यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्रावंती म्हणाल्या, ‘‘मला काँग्रेसमध्ये अपमान सहन करावा लागला. एखाद्या व्यक्तीला जेव्हा नेता मानता तेव्हा, त्याला आदर सन्मान देणेही आवश्‍यक असते मात्र काँग्रेसमध्ये मला त्याचा अभाव जाणवला. यामुळे मी पक्षांतर केले’’.

तेलंगणमधील काँग्रेसच्या माजी प्रवक्त्या असलेल्या श्रावंती यांनी सांगितले की, तेलंगणात काँग्रेसमधीलच काही नेते पक्ष संपवत असून याबाबत पक्षश्रेष्ठींना वर्षभरापूर्वीच सांगितले होते, परंतु वर्षभरात या नेत्यांवर कोणतीही कारवाई झाली नसल्याने अखेर पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.

श्रावंती यांनी यावेळी तेलंगणातील काँग्रेसचे नेते रेवंथ रेड्डी, कोमाटी रेड्डी आणि राजगोपाल रेड्डी या नेत्यावर जोरदार टीका केली. ‘‘रेवंथ रेड्डी यांना पक्षात घेतल्यापासून ते पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात काम करत आहेत.’’ असा आरोपही श्रावंती यांनी यावेळी केला. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT