देश

काँग्रेसला मोठा धक्का, केरळमधील ज्येष्ठ नेत्यानं दिला राजीनामा

सकाळवृत्तसेवा

केरळ विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. केरळमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गांधी कुटुंबाचे विश्वासू असलेले पीसी चाको यांनी राजीनामा दिला आहे. पीसी चाको आज, बुधवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना आपला राजीनामा सपुर्द केला आहे. पीसी चाको यांनी एएनआयला बोलताना ही माहिती दिली. पीसी चाको पक्षाच्या नेतृत्वावर नाराज होते. 

पीसी चाको यांनी सोनिया गांधी यांना पाठवलेल्या राजीनाम्यात केरळमधील काँग्रेसच्या पक्षात सुरु असलेल्या गटबाजीमुळे पक्ष सोडत असल्याचं सांगितलं आहे.

पीसी चाको जवळपास पाच दशकांपासून कांग्रेस पक्षासोबत होते. यादरम्यान त्यांनी मोठमोठी पदं भूषवली आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते केरळमधील काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावर नाराज होते. राजीनामा दिल्यानंतर चाको म्हणाले की, 'गेल्या काही दिवसांपासून मी राजीनामा देण्याचा विचार करत होतो. केरळमध्ये काँग्रेस एक पक्ष असल्यासारखं वाटत नाही. इथं दोन पक्ष आहेत. एक म्हणजे काँग्रेस (आई) आणि काँग्रेस (ए). येथे दोन पक्षांची कोऑर्डिनेशन कमिटी आहे. जी KPCC च्या रुपात काम करत आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : धनुष्यबाण राहणार की जाणार? शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुनावणी

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT