Congress leader Pijush Kanti Biswas And Five Others Join TMC esakal
देश

Tripura Congress : त्रिपुरात काँग्रेसला मोठा झटका; माजी प्रदेशाध्यक्षांसह 5 बड्या नेत्यांचा TMC मध्ये प्रवेश

त्रिपुरात पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

त्रिपुरात पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होणार आहेत.

त्रिपुरा काँग्रेसचे (Tripura Congress) ज्येष्ठ नेते पीजुष कांती बिस्वास (Pijush Kanti Biswas) यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला आहे. बुधवारी तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाल्यानंतर, त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची दिल्लीत भेट घेतली.

त्रिपुरामध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि TMC या राज्यात जोरदारपणे निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. त्रिपुरामध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. मात्र, टीएमसीच्या प्रवेशानं पुढील वर्षी ही लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे.

बुधवारी दिल्लीत टीएमसीच्या खासदारांची बैठक झाली. या बैठकीनंतर, त्रिपुरा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असलेले पीजुष कांती पक्षाच्या इतर पाच नेत्यांसह टीएमसीमध्ये दाखल झाले. या सर्वांनी ममता बॅनर्जी आणि टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. टीएमसीमध्ये सामील झालेल्या इतर नेत्यांमध्ये तेजन दास, अनंत बॅनर्जी, पूर्णिता चकमा, समरेंद्र घोष यांचा समावेश आहे. पीजुष कांती टीएमसीमध्ये सामील झाल्यानंतर त्यांना टीएमसी त्रिपुराचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त केलं जाऊ शकतं. कारण, सध्या ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी त्रिपुरातील संपूर्ण जबाबदारी पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: हिंसक कारवाईची मोठी किंमत! हत्याकांड प्रकरणी शेख हसीना दोषी; बांगलादेश न्यायालयाकडून मृत्युदंडाची शिक्षा

Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुल परिसरात अपघाताची मालिका सुरूच; तीव्र उतारावरून येणाऱ्या ४ ते ५ गाड्यांची धडक

Mokhada Accident:'पालघर- संभाजीनगर बसला अपघात'; 25 हुन अधिक प्रवासी जखमी, तिघे गंभीर..

Latest Marathi Breaking News: घाटकोपरच्या केव्हीके शाळेत पुन्हा विषबाधेचा प्रकार

Winter Care Tips : थंडीत तुमचा कूलर बनेल Room Heater! फक्त 130 रुपयांत 'हा' करा सोपा जुगाड

SCROLL FOR NEXT