Prithviraj Chavan google
देश

'Narendra Modi देशातील सर्वात मोठी बिनकामाची मालमत्ता'

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दोन्ही ट्विटीची नेटिझन्सनी चांगलीच दखल घेतल्याचे दिसून येत आहे. नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात केलेल्या कामगिरीवरून परदेशातूनही टीका हाेत आहे. आता भारतातील सर्वाेच्च नाकार्ती, बिनकामाची मालमत्ता म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे.

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सध्या देशात तसेच महाराष्ट्रात काेविड 19 मुळे (covid 19 pandemic ) हाहाकार माजला आहे. कोविड बाधितांची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) पुर्णपणे अपयशी ठरल्याची टीका काॅंग्रेसमधून हाेऊ लागली आहे. ज्येष्ठ नेेते माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (prithivriaj chavan) यांनी आज (बुधवार) पंतप्रधान मोदी यांना देशातील सर्वात मोठी बिनकामाची मालमत्ता असल्याचं म्हटलं आहे. (congress leader prithviraj chavan criticises pm narendra modi covid19 satara marathi news)

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठे नाॅन परफोर्मिंग असेट असल्याचं चित्र पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट केले आहे आहे. आमदार चव्हाणांनी नरेंद्र मोदींच्या छायाचित्रासह केलेले ट्विट चर्चेत आले आहे. त्यामध्ये भारतातील सर्वाेच्च नाकर्ती (बिनकामाची) मालमत्ता असेही चव्हाण यांनी माेंदीना म्हटलं आहे.

याबराेबरच गंगा नदीत सापडलेल्या काेविड बाधितांच्या रूग्णांच्या प्रेतावरूनही भाजपावर टीका केली आहे. आमदार चव्हाण यांच्या टविटवर नेटिझन्सच्या प्रतिक्रिया पडू लागल्या आहेत. कोविडच्या काळात मोदी सरकारवर काॅंग्रेसकडून सातत्याने समाज माध्यमातून हल्ला चढविला जात आहे. काेविड रूग्णांचा खरा आकडा आता गंगा नदीत सापडण्यास सुरूवात झाली आहे असं म्हणत केंद्र सरकारवर निशाणा साधला जात आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दोन्ही ट्विटीची नेटिझन्सनी चांगलीच दखल घेतल्याचे दिसून येत आहे. नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात केलेल्या कामगिरीवरून परदेशातूनही टीका हाेत आहे. आता भारतातील सर्वाेच्च नाकार्ती, बिनकामाची मालमत्ता म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT