Rahul Gandhi Esakal
देश

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Rahul Gandhi file nomination from Raebareli: काँग्रेसने अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा केली आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- काँग्रेसने अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. राहुल गांधी रायबरेली (Rahul Gandhi file nomination from Raebareli) मतरारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर अमेठी मतदारसंघातून काँग्रेस नेते केएल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

एएनआयच्या रिपोर्टनुसार, काँग्रेसने शुक्रवारी दोन्ही जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली. विशेष म्हणजे उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख ३ मे आहे. त्यामुळे काँग्रेस या दोन मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यास वेळ केला हे स्पष्ट आहे. मात्र, आज दोन्ही उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर आजच उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल. काँग्रेसकडून याची अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे.

रायबरेली आणि अमेठी मतदारसंघ काँग्रेसचे गढ मानले जातात. पण, गेल्या काही वर्षांमध्ये या दोन्ही मतदारसंघातून काँग्रेसची पिछेहाट होताना दिसत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांचा भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी अमेठीतून पराभव केला होता. राहुल गांधी यांच्यासाठी आणि काँग्रेससाठी हा मोठा धक्का होता. २०२४ त्या लोकसभा निवडणुकीतही स्मृती इराणी अमेठीतून लोकसभेच्या रिंगणात आहेत.

रायबरेली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी निवडणूक लढवतात. पण, त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्या राज्यसभेच्या माध्यमातून संसदेत गेल्या आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांना रायबरेलीमधून मैदानात उभे करण्यात आले आहे. रायबरेलीतून भाजपचे दिनेश प्रताप सिंह मैदानात आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये थेट लढत होईल.

प्रियांका गांधी यांना देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता होती. त्यांना रायबरेलीतून तिकीट देण्यात येईल अशी चर्चा होती. पण, ती फोल ठरली आहे. त्यामुळे प्रियांका निवडणूक प्रचार करण्यापूर्तेच मर्यादीत राहतील हे स्पष्ट आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळच्या वायनाडमधून देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Gaikwad Reaction : शेतकरी संकटात अन् मंत्री फुलांवरून चालले; संजय गायकवाडांचा शिरसाटांना घरचा आहेर

Sangli Water Restriction:धरणे तुडुंब भरलेली असताना उपसाबंदी कशासाठी? राजू शेट्टींचा शासनावर हल्लाबोल : सांगली-कोल्हापुरात पहिल्यांदाच निर्णय

Thailand Ganeshotsav : ढोल-ताशांचा गजर, भक्तिगीते अन् गणेश विसर्जन मिरवणूक; बँकॉकमध्ये रंगला गणेशोत्सव

Marathi News Live Updates : बदलापुरात बसची दुचाकीला धडक दुचाकीवरील तरुणीचा मृत्यू, तरुण गंभीर जखमी

लालबागच्या राजाच्या चरणांचं कुंकू पत्नीच्या भांगेत भरलं अन्...; संजय दत्तचा Viral Video, नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT