Thailand Ganeshotsav : ढोल-ताशांचा गजर, भक्तिगीते अन् गणेश विसर्जन मिरवणूक; बँकॉकमध्ये रंगला गणेशोत्सव

Over 5,000 Indian and Thai Devotees Participate : दोन दिवसांच्या या सोहळ्यात भारतीय आणि थाई समुदायातील ५ हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले; ढोल-ताशांच्या गजरात गणेश विसर्जन मिरवणूकही काढण्यात आली.
Thailand Ganeshotsav

Thailand Ganeshotsav

esakal

Updated on

विश्व हिंदू परिषद असोसिएशन, थायलंड (VHP Thailand) यांच्या वतीने आयोजित १९वा गणेश महोत्सव बँकॉकमधील निमिबुत्र स्टेडियम, नॅशनल स्टेडियम येथे उत्साहात संपन्न झाला. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात भारतीय तसेच थाई समुदायातील ५ हजारांहून अधिक नागरिक आणि भक्तांनी सहभाग घेतला.

महोत्सवादरम्यान पारंपरिक धार्मिक विधी, भक्तिगीते, संगीत आणि नृत्य यांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला थायलंडमधील भारताचे राजदूत पुनीत अग्रवाल यांच्यासह भारत आणि थायलंडमधील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Thailand Ganeshotsav
Election Commission of India : एसआयआरवरून निवडणूक आयोगातच मतभेद; दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

VHP Thailandच्या अध्यक्ष वैशाली तुषार उरूमकर यांनी उपस्थित मान्यवर आणि भक्तांचे स्वागत केले. गणेश महोत्सवाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि परंपरा जपण्यासोबतच भारत आणि थायलंडमधील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.

ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूक

महोत्सवाच्या समारोपानिमित्त भव्य गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात भारतीय आणि थाई नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषा आणि सांस्कृतिक सादरीकरणामुळे मिरवणुकीला विशेष रंगत आली.

Thailand Ganeshotsav
ज्यांच्या ठसक्याने रंगायचा लावणीचा फड! त्या शकुंतलाताई नगरकर काळाच्या पडद्याआड, कलाविश्वावर शोककळा

महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी VHP Thailandच्या कार्यकारिणी सदस्य, विश्वस्त, स्वयंसेवक, प्रायोजक आणि देणगीदारांचे आभार मानण्यात आले.

‘वसुधैव कुटुंबकम्’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेला हा गणेश महोत्सव भारतीय संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवणारा ठरला. तसेच भारत आणि थायलंडमधील सांस्कृतिक मैत्रीला जोडणारा एक महत्त्वाचा सोहळा म्हणून त्याकडे पाहिले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com