Congress leader Rahul Gandhi in the National Herald case Sonia Gandhi ED enquiry today esakal
देश

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात सोनिया गांधी आज ईडीसमोर

कॉंग्रेस नेते राहुल गांधींची नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीद्वारे मागील महिन्यात पाच दिवस चौकशी

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आज (ता. २१) ईडीसमोर चौकशीसाठी हजर होणार आहे. हा प्रकार राजकीय सुडाचा असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. तसेच सोनिया गांधींना पाठिंबा दर्शविण्यासाठी उद्या देशभरात निदर्शने करण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतला आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधींची नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीद्वारे मागील महिन्यात पाच दिवस चौकशी झाली होती. तर कोरोना संसर्ग आणि त्यानंतरच्या आजारपणामुळे सोनिया गांधी या चौकशीसाठी हजर होऊ शकल्या नव्हत्या. या कारणामुळे त्यांनी चौकशीची वेळ बदलण्याची विनंती ईडीकडे केली होती. त्यापार्श्वभूमीवर आता उद्या त्या ईडीसमोर जातील. यादरम्यान, सोनिया गांधींना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी कॉंग्रेसचे सर्व खासदार, नेते निदर्शने करणार आहेत.

पक्षाचे माध्यम विभागाचे प्रभारी सरचिटणीस जयराम रमेश यांनी या मुद्द्यावर ट्विट करून पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष्य करताना या निदर्शनांची घोषणा केली. मोदी- शहा जोडीकडून कॉंग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाविरुद्ध ज्या प्रकारे राजकीय सूड घेतला जात आहे त्याविरुद्ध कॉंग्रेस पक्षातर्फे सोनिया गांधींना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी उद्या देशभरात निदर्शने करण्यात येतील, असे जयराम रमेश यांनी यात म्हटले. तर, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी कॉंग्रेस नेत्यांनी बैठक घेऊन उद्याच्या शक्तीप्रदर्शनाची रणनीती ठरविली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Female Doctor Case : साताऱ्यातील डॉक्टर तरुणीच्या प्रकरणात वांरवार फोन करणारा खासदाराचा पीए कोण? कुटुंबियांचे गंभीर आरोप

Satara Women Doctor Case: वरिष्ठांच्या दबावामुळे महिला डॉक्टरनं.. काका आणि वडीलांचा मोठा खुलासा | Sakal News

Satara Female Doctor: साताऱ्यातील महिला डॉक्टर आणि पोलिसाची ओळख कशी झाली? गुन्ह्यातील 'तो' दुसरा आरोपी कोण? मोठी माहिती समोर

Guru Transit 2025: गुरु उच्च राशीत कर्क राशीत प्रवेश; 'या' राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या तुमचं राशिभविष्य

Jr Hockey World Cup: पाकिस्तानची आशिया कपपाठोपाठ भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपमधूनही माघार! बदली संघाची होणार घोषणा

SCROLL FOR NEXT