rahul gandhi 
देश

दिलेला शब्द पाळणारा नेता; राहुल गांधींचा व्हिडिओ चर्चेत!

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एका लहान मुलाला दिलेला शब्द पूर्ण केला आहे. राहुल गांधी तामिळनाडूच्या दौऱ्यावर असताना ते कन्याकुमारीला गेले होते. यावेळी एका 12 वर्षाच्या मुलाला त्यांनी मदत करण्याचे वचन दिले होते. राहुल गांधींनी त्यांचा शब्द पाळला आहे. तामिळनाडू युथ काँग्रेसने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. राहुल गांधी कन्याकुमारीला गेले होते, त्यावेळी ते एका चहाच्या स्टॉल जवळ थांबले होते. त्यावेळी, त्यांना रस्त्याच्या कडेला पायात चप्पल नसलेला अँटनी फेलिक्स नावाचा एक लहान मुलगा दिसला. फेलिक्सने तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री के कामराज यांचे फोटो हातात धरला होता. राहुल गांधींनी या मुलाकडे चालत जात त्याच्याशी संवाद साधला. 

राहुल गांधींनी फेलिक्सच्या खांद्यावर हात ठेवत, त्याच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. राहुल यांनी त्याला त्याच्या आवडीनिवडी विचारल्या. तुला काय आवडतं, असं विचारल्यानंतर फेलिक्सने सांगितलं की त्याला धावायला आवडतं. फेलिक्स पाचवीमध्ये शिकतो. त्याने 100 मीटर शर्यतीत आपण तरबेज असल्याचं सांगितलं. अॅथलिस्ट फेलिक्सला राहुल यांनी तू माझ्यापेक्षा जास्त वेगाने धावू शकतोस का, असा प्रश्व विचारला. तसेच तू धावताना पायात काही घालत नाहीस का, असं राहुल यांनी फेलेक्सिला विचारलं. तो अनवाणी पायाने धावतो, हे कळताच राहुल गांधी यांनी त्याला स्पोर्ट्स शूज देण्याचा शब्द दिला होता. राहुल यांनी आपला शब्द पाळला आहे. 

राहुल गांधी यांनी अँटनी फेलिक्सला स्पोर्ट्स शूज पाठवले आहेत. तामिळनाडू युथ काँग्रेसने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. राहुल गांधी यांनी तमिळनाडू दौऱ्यावर आले असताना एका लहान मुलाला स्पोर्ट्स शूज देण्याचे वजन दिले होते. काँग्रेस नेत्याने हे वचन पूर्ण केले आहे, असं ट्विटमध्ये म्हणण्यात आलंय. 

दरम्यान, राहुल गांधी सध्या विविध कारणांमुळे चर्चेत येत आहे. त्यांचा केरळ आणि तमिळनाडू दौरा चांगलाच गाजला. त्यांनी येथील स्थानिक लोकांशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधी मच्छिमारांसोबत समुद्रात पोहोताना दिसले, तर कधी त्यांनी मुलांसोबत पुश-अप्स काढल्या. तमिळनाडूतील एका गावातील लोकांसोबत त्यांनी मशरुम बिर्याणीचा आनंद घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. राहुल गांधींना दक्षिणेतील राज्यातून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT