congress leader rahul gandhi pm narendra modi surrender modi twitter
congress leader rahul gandhi pm narendra modi surrender modi twitter 
देश

राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर खळबळजनक टीका

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून टीका करत, खळबळ उडवून दिली. भारत-चीन संबंधांवरून सध्या सुरू असलेल्या परिस्थितीला पंतप्रधान मोदीच जबाबदार असल्याचं राहुल गांधी यांनी ट्विट करताना म्हटलंय. ट्विट सोबत त्यांनी जपान टाईम्सच्या एका बातमीची लिंकही शेअर केलीय.

राहुल गांधी यांनी ट्विट करताना, पंतप्रधान मोदींचा उल्लेख 'सरंडर मोदी' असा केलाय. Narendra Modi Is actually Surender Modi, असं ट्विट राहुल यांनी केलंय. भारत-चीन सीमेवर ज्या घटना घडत आहेत, त्यावर पंतप्रधान मोदी का गप्प आहेत?, असा प्रश्न राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून केला होता. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली होती. चीनने भारतीय भूभागात प्रवेश केलेला नाही, असा खुलासा मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत केला होता. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जपान टाईम्स काय म्हणतोय?
चीनला शांत करण्यासाठी अनेक वर्षे माघार घेतल्यानंतरही मोदींना भारतीय भूभागावर अजून एक चिनी अतिक्रमण पहायला मिळाले आहे. मोदींचा चीनविषयीचा दृष्टिकोन बदलण्यासाठी हे पुरेसे आहे का?, असा प्रश्न जपान टाईम्सने उपस्थित केला आहे. सध्याच्या भारत-चीन सीमेवरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगाचं लक्ष याकडं लागलंय. अमेरिका आणि संयुक्त राष्ट्र या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT