Rahul-Gandhi 
देश

'मोदींच्या अश्रुंनी नाही तर ऑक्सिजनने लोकांना वाचवता आलं असतं'

सूरज यादव

नवी दिल्ली - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकारने सज्ज रहायला हवं असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं. तसंच मोदी सरकारने वैज्ञानिकांनी दिलेल्या इशाऱ्याकडे गांभीर्याने बघायला हवं असा सल्ला राहुल गांधी यांनी दिला. कोरोना संदर्भात काँग्रेसकडून श्वेत पत्रिका प्रकाशित करण्यात येत आहे. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी पंतप्रधान मोदी यांचं ध्येय हे बंगालची निवडणूक होतं. त्यावेळी ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासत होता. लोकांचा जीव जात होता. पंतप्रधानांच्या अश्रूंनी नव्हे तर ऑक्सिजनने जीव वाचवता आले असते असं म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका केली.

राहुल गांधी म्हणाले की, कोरोना फक्त बायोलॉजिकल नाही तर आर्थिक आणि सामाजिक आजार आहे. या संकटात मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांना मदतीची गरज आहे. यासाठी कोरोना मदत निधी द्यावा असंही त्यांनी म्हटलं. कोरोनाच्या या संकटात केंद्र सरकारवर टीका करण्याचा कोणताही उद्देश नाही. श्वेत पत्रिका ही सरकारला मदत करण्यासाठीच असल्याचंं राहुल गांधी यांनी सांगितलं.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसरी लाट ही विध्वंसक होती. यामुळे खूप मोठं नुकसान जालं. आम्ही यामागची कारणं शोधण्याचा प्रयत्न केला. इतकंच काय तर कोरोनाचे म्युटंट पाहता असंही म्हणू शकतो की तिसऱ्या लाटेनंतरही आणखी लाटा येऊ शकतात अशी भीतीही राहुल गांधी यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Marathi News Live Updates : संजय राऊत यांचा 'वंदे मातरम्' वरुन सरकारवर निशाणा

घरी नणंदेसोबत कशी वागते करीना कपूर? सैफ अली खानच्या बहिणीने सांगितली आतली गोष्ट; म्हणाली- ती नाटकी...

Numerology Success After 35 : 'या' मूलांकाच्या लोकांना उशिरा मिळते यश; आधी करावा लागतो संघर्ष, पण वयाच्या पस्तीशी-चाळीशीनंतर बदलते नशीब

Aditya Thackeray: राज्यातील उद्योगांची स्थिती बिकट, ३५ हजार उद्योग बंद, रोजगारावर गंभीर परिणाम; आदित्य ठाकरेंचे आरोप

SCROLL FOR NEXT