Congress leader Rahul Gandhi updates his Twitter account bio to Dis'Qualified MP 
देश

Dis’Qualified MP...राहुल गांधींच्या ट्विटर बायोमध्ये मोठा बदल

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आलीय.

सकाळ डिजिटल टीम

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आलीय. सूरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना २ वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभेने राहुल गांधी यांचं सदस्यत्व रद्द केल. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. दरम्यान, राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर बायोमध्ये मोठा बदल केला आहे. (Congress leader Rahul Gandhi updates his Twitter account bio to Dis'Qualified MP)

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटचा बायो अपडेट केला असून त्यात 'अपात्र लोकसभा सदस्यत्व' असे लिहिले आहे.

नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

लोकसभा सचिवालयानं कायद्यानुसार राहुल गांधी यांचं सदस्यत्व रद्द केलंय. भविष्यात जर राहुल गांधी यांची शिक्षा कमी झाली तरच त्यांना खासदारकी पुन्हा बहाल करण्यात येईल. दरम्यान, ट्विटर बायोमध्ये बदल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उत आला आहे.

तर दुसरीकडे राजघाटावर संकल्प सत्याग्रह काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि अध्यक्ष खर्गे यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे.

काय आहे प्रकरण?

चोरों का सरनेम मोदी क्यो होता है… काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं २०१९ चं हे विधान त्यांना भोवलं आहे. या मानहानीच्या खटल्यात सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांना जामीनही मंजूर केला आहे. या खटल्याच्या सुनावणीवेळी राहुल गांधी स्वत: कोर्टात उपस्थित होते.

राहुल गांधी यांच्या विधानामुळे संपूर्ण मोदी समुदायाचा अपमान झाल्याचा दावा भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी केला होता. त्यांनी या प्रकरणी कोर्टात केस दाखल केली होती.

चार वर्षापूर्वीच्या या प्रकरणावर शुक्रवारी म्हणजेच सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर सुरत जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल दिला. या प्रकरणात कोर्टाने राहुल गांधी यांना दोषी ठरवलं.

दोन वर्षाची शिक्षा सुनावली. मात्र लगेच राहुल गांधी यांना जामीनही मंजूर करण्यात आला. मात्र त्यांची खासदारकी गेली. लोकसभा सचिवलयाने राहुल गांधी यांच्यावर मोठी कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT