Surgical Strike Pakistan Congress leader Rashid Alvi esakal
देश

Surgical Strike Row: 'सर्जिकल स्ट्राइक'चा वाद पेटला; काँग्रेसनं भाजपकडं मागितला 'हा' पुरावा, सरकारच्या भूमिकेकडं लक्ष

सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ सरकारकडं असेल तर तो दाखवावा, असं काँग्रेस नेत्यानं म्हटलंय.

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तानवर लष्करानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आम्ही प्रश्न उपस्थित करत नाही, फक्त व्हिडिओ तो मागत आहोत.

नवी दिल्ली : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांनी सर्जिकल स्ट्राईकवर (Surgical Strike Pakistan) उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर हा वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये. आता राशिद अल्वी यांनीही याबाबतचे पुरावे मागितले आहेत.

काँग्रेस नेते रशीद अल्वी (Congress leader Rashid Alvi) म्हणाले, माझा सुरक्षा दलांवर (Indian Army) पूर्ण विश्वास आहे, पण भाजप सरकारवर (BJP Government) विश्वास नाही. यासोबतच त्यांनी याबाबतचा व्हिडिओ जारी करण्याची मागणी सरकारकडं केलीये.

'दिग्विजय सिंहांचं काहीही चुकीचं नाही'

रशीद अल्वी पुढं म्हणाले, दिग्विजय सिंह यांनी सरकारला विचारलेल्या प्रश्नांबाबत काहीही चुकीचं नाही. सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ सरकारकडं असेल तर तो दाखवावा, असं काँग्रेस नेत्यानं म्हटलंय. दिग्विजय सिंह सरकारला व्हिडिओ दाखवायला सांगत आहेत त्यात काय चूक? आम्ही सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागत नाही, पण सरकारनं आपल्या दाव्याचा व्हिडिओ दाखवावा, असंही त्यांनी म्हटलंय.

'भाजपनं व्हिडिओ दाखवावा, अन्यथा माफी मागावी'

अल्वी म्हणाले, भाजप नेहमीच खोटे बोलतो आणि त्यात माहिर आहे. पाकिस्तानवर लष्करानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आम्ही प्रश्न उपस्थित करत नाही, फक्त व्हिडिओ तो मागत आहोत. भाजप सरकारकडं व्हिडिओ नसेल तर त्यांनी देशाची माफी मागावी, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT