Rahul Gandhi News updates esakal
देश

Rahul Gandhi: प्रभू रामाशी राहुल गांधींची थेट तुलना; खुर्शीद म्हणाले, रामाची भूमिका घेऊनच आम्ही..

'भाजप द्वेष पसरवून देश तोडण्याचं काम करत आहे. देशाची मानसिकता मोडीत काढण्याचा हा प्रयत्न आहे.'

सकाळ डिजिटल टीम

'भाजप द्वेष पसरवून देश तोडण्याचं काम करत आहे. देशाची मानसिकता मोडीत काढण्याचा हा प्रयत्न आहे.'

मुरादाबाद : माजी परराष्ट्र मंत्री आणि काँग्रेस नेते सलमान खुर्शीद (Salman Khurshid) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची तुलना भगवान श्रीरामाशी (Lord Shri Ram) केलीये. प्रभू राम सर्वत्र जाऊ शकत नाहीत. मात्र, त्यांचा काफिला खूप दूरवर जातो, असं त्यांनी आपल्या वक्तव्यात म्हटलंय. (Rahul Gandhi News)

प्रभू रामाची भूमिका घेऊन आम्ही (काँग्रेस) चालत आहोत. हा काफिला आता उत्तर प्रदेशात आला आहे, त्यामुळं रामही येणार आहे. राहुल गांधी योगीप्रमाणं तपश्चर्या करत आहेत, असंही खुर्शीद यांनी सांगितलं.

यूपीच्या मुरादाबाद सर्किट हाऊसमध्ये काँग्रेस नेते खुर्शीद पुढं म्हणाले, 'भाजप द्वेष पसरवून देश तोडण्याचं काम करत आहे. देशाची मानसिकता मोडीत काढण्याचा हा प्रयत्न आहे. राहुल गांधी सुपर ह्युमन आहेत. कडाक्याच्या थंडीत ते टी-शर्ट घालूनच बाहेर पडतात.'

दरम्यान, खुर्शीद कोविडचं संकट वाढण्याच्या आणि मास्क घालण्याच्या प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी पत्रकारांवरच भडकले. ते म्हणाले, तुमच्यापैकी फक्त एकानंच मास्क घातला आहे. भाजपचं म्हणणं का मान्य करायचं? आमचे नेते राहुल गांधी यांनी यापूर्वीही कोरोनाबाबत इशारा दिला होता; पण त्याकडं दुर्लक्ष करण्यात आलं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT