Shashi Tharoor
Shashi Tharoor 
देश

गंगा भी स्वच्छ रखनी है और पाप भी यहीं धोने हैं: थरूर

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंत्रिमंडळासह प्रयागराज येथे गंगा नदीत स्नान केल्यानंतर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी गंगा भी स्वच्छ रखनी है और पाप भी यहीं धोने हैं, असे ट्विट करत त्यांना लक्ष्य केले.

आदित्यनाथ यांनी प्रथमच मंत्रिमंडळाची बैठक प्रयागराज येथे घेतली. योगी आदित्यनाथ यांनी कुंभ मेळ्यानिमित्त मंगळवारी येथील पवित्र संगमावर स्नान केले. मंत्रिमंडळाची बैठक येथे झाल्यानंतर त्यांनी हे स्नान केले. त्यांच्या मंत्रिमंडळातील बहुसंख्य सदस्यांनीही मुख्यमंत्र्यांचा कित्ता गिरवला. स्नानानंतर योगी आदित्यनाथ यांनी सहकाऱ्यांसह हनुमान मंदिरात आरती केली. थरूर यांनी यावरूनच उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे.

थरूर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की गंगा नदी स्वच्छ पण ठेवायची आहे आणि सगळे पाप येथेच धुवायचे आहेत. या संगमावर सगळेच विवस्त्र आहेत. जय गंगा मैया की. थरूर यांच्या टीका भाजपला चांगलीच झोंबली आणि त्यांनी पलटवार करताना म्हटले, की ज्या संस्कृतीत ते मोठे झाले आहेत, त्यांना कुंभमेळ्याचे महत्त्व काय समजणार. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता परतले विजयी मार्गावर, सॉल्टच्या तुफानी अर्धशतकानंतर दिल्लीवर मिळवला सोपा विजय

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT