सोफिया फिरदौस सकाळ
देश

ओदिशाच्या पहिल्या मुस्लिम महिला आमदाराचा किताब मिळवणाऱ्या सोफिया फिरदौस कोण आहेत?

गेले दोन दिवस सोफिया फिरदौस हे नाव ट्रेंडिंग आहे. ओदिशा विधानसभेचे निकाल जाहीर झाले. हिंदुत्त्ववादी भाजपने तिकडे दणदणीत विजय मिळवलेला आहे, पण गंमत म्हणजे ओदिशातली पहिली महिला मुस्लिम आमदार याच काळात निवडून आली आहे.

स्वाती केतकर-पंडित

जेमतेम ३२ वर्षांच्या सोफिया फिरदौस या ओदिशातील पहिल्या मुस्लिम महिला आमदार ठरल्या आहेत.त्यांचे वडील काँग्रेस नेते मोहम्मद मुअक्विम यांच्या जागी सोफिया यांनी निवडणूक लढवली आणि जिंकलीही.

काँग्रेसने सोफियांना जेमतेम महिनाभर आधी तिकीट दिलं होतं.बारबती-कटक मतदारसंघातून सोफिया निवडून आल्या आहेत. भाजपच्या पूर्ण चंद्र महापात्रा यांचा सोफिया यांनी आठ हजार मतांनी पराभव केला आहे.

पण केवळ काँग्रेस नेत्याची मुलगी एवढीच सोफिया यांची ओळख नाही.

  • सोफिया सुशिक्षित आहेत. त्यांनी कलिंगा इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रिअल टेक्नॉलॉजी या संस्थेतून सिव्हील इंजिनीअरिंगची पदवी घेतलेली आहे.

  • शिवाय त्यांनी आयआयएम, बंगळुरु येथून 2022 मध्ये व्यवस्थापनशास्त्रातील शिक्षणही घेतले आहे. त्यांनी एक्झिक्युटिव्ह जनरल मॅनेजमेंट प्रोग्रॅम पूर्ण केलेला आहे.

  • 2023मध्ये सोफिया फिरदौस यांची कॉन्फेडरेशन ऑफ रीयल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (CREDAI)च्या भुवनेश्वर विभागाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. क्रेडाइच्या महिला विभागासाठी पूर्व विभागाच्या समन्वयक म्हणूनही काम पाहतात.

  • इंडियन ग्रीन बिल्डिंग काऊन्सिल (IGBC) आणि INWEC सारख्या संस्थांमध्येही सोफिया महत्त्वाची पदे भूषवतात.

आणखी महत्त्वाची बाब अशी की ज्या मतदारसंघातून सोफिया निवडून आल्या आहेत, त्या बारबती-कटक मतदारसंघातून ओदिशाच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री नंदिनी सेतुपती 1972मध्ये निवडून आल्या होत्या.

ओदिशातील लोकसभा जागांवरही यावेळी भाजपचेच प्राबल्य राहिले आहे. त्यामुळे या हिंदुत्त्ववाद्यांचा विजय झालेल्या राज्यात पहिली मुस्लिम महिला आमदार हा किताब मिळवणाऱ्या सोफिया त्या विक्रमाला जागून तसेच काम करतात की केवळ नामधारी राहतात, हे येणारा काळच सांगेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात धो-धो! पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे; पुणे-रायगडला 'रेड अलर्ट', मुंबईसह 26 जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा इशारा

Police Transfer: पोलिसांत मोठा फेरबदल! १२५ डीएसपी अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; अनेक जिल्ह्यांना नवे अधिकारी, कुणी घेतला निर्णय?

Pune News: मोठी दुर्घटना टळली! कुसगाव खिंडीत दरड कोसळल्याने राजगड–हवेली मार्गावरील वाहतूक ठप्प; प्रशासनाने तातडीने हटवला अडथळा

Latest Marathi News Live Update : पुण्यात पावसाची संततधार; घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस ‘रेड अलर्ट’

Pune Water Crisis: पुण्याची पाणीचिंता वाढली! खडकवासला धरणसाखळीतील साठा गतवर्षीपेक्षा पाचपट कमी; केवळ ७६ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक

SCROLL FOR NEXT