Kangana Ranaut Supriya Shrinate 
देश

कंगना रनौतचे जोरदार प्रत्युत्तर, काँग्रेस नेत्या सुप्रिया गेल्या बॅकफूटवर; वाद नेमका का सुरु झाला आहे?

Supriya Shrinate issues clarification her post: बॉलीवूड अभिनेत्री आणि भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार कंगना रनौत आणि काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्यात वाद निर्माण झाला आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- बॉलीवूड अभिनेत्री आणि भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार कंगना रनौत आणि काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्यात वाद निर्माण झाला आहे. सुप्रिया श्रीनेत यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर कंगनाबाबत अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती. यानंतर कंगनाने तिखट प्रतिक्रिया दिली. सुप्रिया श्रीनेत या प्रकरणावरुन बॅकफूटवर गेल्या आहेत. (Congress leader Supriya Shrinate issues clarification)

सुप्रिया श्रीनेत यांनी आपल्या पोस्टप्रकरणी स्पष्टीकरण देताना म्हटलं की, माझे फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट अनेकजण वापरतात. त्यापैकी एकाने ही आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. मला जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा मी ती पोस्ट डिलिट केली आहे. मला जे ओळखतात त्यांना माहिती आहे की मी महिलांबाबत कधीही असं वक्तव्य करणार नाही.( post on BJP candidate from Mandi Kangana Ranaut)

सुप्रिया पुढे म्हणाल्या की, हे कोणी केलं याचा मी शोध घेत आहे. माझ्या नावाचा वापर ट्वीटरवर देखील केला जात आहे. माझ्या नावाने एक पॅरोडी अकाऊंट सुरु करण्यात आलं आहे. तेथे करण्यात आलेली पोस्ट कॉपी करुन ती फेसबुक आणि इन्स्टाग्रावर पेस्ट करण्यात आली. ज्यांच्याकडे अकाऊंट वापरण्यास दिले होते त्यांचा मी शोध घेत आहे. तसे ट्वीटरवरील पॅरोडी अकाऊंटबाबत मी तक्रार केली आहे.

कंगना काय म्हणाली?

सुप्रिया यांच्या सोशल मीडियावर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टनंतर कंगनाने निशाणा साधला होता. प्रिय सुप्रिया जी, एक कलाकार म्हणून मी २० वर्षांपासून काम करत आहे. या काळात मी विविध महिलांची भूमिका निभावली आहे. क्वीनमध्ये एका साध्या मुलीपासून धाकडमध्ये एक आकर्षक जासूज, तसेच मणिकर्णिकामध्ये एक देवी ते चंद्रमुखी चित्रपटात एका राक्षसाची भूमिका देखील मी केली आहे, असं कंगना म्हणाली.

कंगना पुढे म्हणाली की, महिलांबाबत लोकांना पूर्वाग्रहांपासून मुक्त करण्याची गरज आहे. महिलांच्या शरीरापेक्षा त्यांना एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहिलं पाहिजे. वैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना देखील सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. कंगनाने काँग्रेस नेत्या सुप्रिया यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, भाजपच्या इतर काही नेत्यांनी देखील या मुद्द्यावरुन काँग्रेसला घेरलं आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे थोडा जरी अधिकार असला तर त्यांनी सुप्रिया यांच्याकडून राजीनामा घ्यावा, असं भाजप नेते शहजाद पुनावाला म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT