esakal
देश

असे राष्ट्रपती देशाला ना मिळो म्हणत, राष्ट्रपती मुर्मूंवर उदित राज यांची टीका

काँग्रेसने पहिल्यांदाच असे वक्तव्य केले नसून ते नेहेमीच अशी वक्तव्ये करत असतात

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेसचे नेता उदित राज यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्यावर ट्विटरवरून टिका केली आहे. त्यांच्या या टीकेवर भाजपच्या नेत्याने पलटवारदेखील केला आहे. उदित राज यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्याबद्दल अपमानजनक ट्विट केले आहे. द्रोपदी मुर्मू यांनी एक असे विधान केले होते की , 70 % लोक हे गुजरातचे मीठ खातात , स्वत:चे मीठ खाऊन जगून दाखवाल तर कळेल! मुर्मूंच्या या विधानावर काँग्रेस नेता उदित राज यांनी ट्विट केले आहे की , असे राष्ट्रपती कोणत्याही देशाला ना मिळो !

''उदित राज यांनी ज्याप्रकारच्या शब्दांचा वापर भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्यासाठी केला आहे , ते शब्द खूप चिंताजनक आहे. काँग्रेसने पहिल्यांदाच असे वक्तव्य केले नसून ते नेहेमीच अशी वक्तव्ये करत असतात '', असे म्हणत एका भाजप नेत्याने उदित राज यांच्यावर पलटवार केला आहे. तसेच , राष्ट्रीय महिला आयोगाने उदित राज यांना नोटीस देत ''उत्तर देण्यास सांगितले आहे.

''राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी ट्विट केले की , स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर इथपर्यंत पोहोचलेल्या महिलेविषयी अशा प्रकारचे विधान करणे आपत्तीजनक ठरू शकते. त्यामुळे उदित राज यांनी माफी मागितली पाहिजे '' असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी ट्विट केले आहे. त्याचप्रमाणे भाजप नेते संबित पात्रा यांनी म्हटले की ''उदित राज यांनी जे शब्द द्रोपदी मुर्मू यांच्यासाठी वापरले आहेत , ते शब्द खूप चिंताजनक आहे. काँग्रेसचे हे पहिले विधान कनसून ते नेहेमीच अशी वक्तव्ये करत असतात. याआधीही काही जणांनी अशी वक्तव्ये केलेली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

आजचे राशिभविष्य - 26 सप्टेंबर 2026

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT