Shot Dead Esakal
देश

Shot Dead: एकाने हात पकडला तर दुसऱ्याने छातीत मारली गोळी अन्....; काँग्रेस नेत्यासमोरच केली भावाची हत्या

Shot Dead: दिल्ली-एनआरसीमधीव फरीदाबाद परिसरात काँग्रस नेत्याच्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काँग्रेस नेत्याच्या भावाचा काही लोकांसोबत पैशाच्या देवाण-घेवाणीवरून वाद होते.काल रविवारी रात्री नेत्याच्या समोरचं भावाला गोळी घालण्यात आली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

दिल्ली-एनसीआरच्या फरिदाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील नवादा कोह गावात राहणाऱ्या काँग्रेस नेत्याच्या भावाची काल(रविवारी) रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेबाबत तक्रार देताना काँग्रेस नेत्याने सांगितले की, त्यांच्या भावाचा काही लोकांशी पैशाच्या व्यवहारावरून वाद होता. या वादातून त्याच्या भावाची दोन जणांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन पथके तयार केली असून ते आरोपींच्या अड्ड्यांवर छापे टाकत आहेत.

हे प्रकरण फरिदाबादच्या नवादा कोह गावातील आहे. येथे रविवारी रात्री काँग्रेस नेते ज्योतेंद्र भडाणा यांचा भाऊ कुणाल भडाणा यांचा विजय आणि बिल्लू यांच्यासोबत पैशांच्या व्यवहारावरून वाद झाला. वादानंतर कुणाल हा मित्रासोबत मशीद चौकाजवळ उभा होता. यावेळी विजय आणि बिल्लूही तेथे पोहोचले, ज्यांच्याशी कुणालचा वाद सुरू होता. कुणाल, विजय आणि बिल्लू मस्जिद चौकात येताच त्यांच्यात वाद सुरू झाला. वाद इतका टोकाला गेला की विजय आणि बिल्लूने कुणालची गोळ्या झाडून हत्या केली.

काँग्रेस नेते ज्योतेंद्र भडाणा यांनी आपल्या भावाच्या हत्येप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसात तक्रार दाखल करताना काँग्रेस नेत्याने सांगितले की, मला दोन लोकांमध्ये भांडण झाल्याची माहिती त्यांच्या भावाकडून मिळाली होती. माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले असता बिल्लूने त्याचा भाऊ कुणालचा हात पकडून विजयने त्याच्या छातीत गोळी झाडल्याचे दिसले. यानंतर दोन्ही आरोपी त्यांच्या कारमधून पळून गेले. ज्योतेंद्र यांनी सांगितले की, गोळी लागल्यावर त्यांनी कुणालला रुग्णालयात नेले. मात्र, येथील डॉक्टरांनी कुणालला मृत घोषित केले.

काँग्रेस नेत्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी आयपीएसच्या कलम 302 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती देताना डबुआ पोलिसांनी सांगितले की, आरोपींचा शोध सुरू आहे. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली आहेत. पोलिसांची पथके आरोपींच्या अड्ड्यांवर छापे टाकत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २ तरुणींचा १९ वर्षीय तरुणावर पहाटे कोयत्यानं हल्ला, घटना CCTVत कैद; धक्कादायक कारण समोर

Dodamarg Eco-Sensitive Area : 'महाराष्ट्राचे ॲमेझॉन' धोक्यात! केंद्राकडून दोडामार्ग तालुका वगळण्याची 'घोड चूक'; वनशक्ती संस्थेचे सरकारला थेट पत्र

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

SCROLL FOR NEXT