देश

‘कोव्हॅक्सिन’च्या संमतीवर काँग्रेसचे प्रश्‍नचिन्ह 

पीटीआय

नवी दिल्ली - औषध नियंत्रण महासंचालकांनी (डीसीजीआय) भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन लसीला आपत्कालीन वापरासाठी संमती दिल्याच्या निर्णयाबद्दल काँग्रेसच्या नेत्यांनी शंका उपस्थित केली आहे. कोव्हॅक्सिनला मंजुरी देताना अत्यावश्‍यक कार्यपद्धती आणि माहितीच्या सत्यतेची खातरजमा का करण्यात आली नाही, याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे, असे काँग्रेसने म्हटले आहे. 

भारतात सीरम आणि ऑक्सफर्डने तयार केलेल्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपत्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. ‘डीसीजीआय’ने पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. त्यानंतर तापण्यास सुरुवात झाली आहे. 

काँग्रेसचे नेते आनंद शर्मा, जयराम रमेश व शशी थरूर यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. शर्मा म्हणाले, ‘‘कोव्हॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील आवश्‍यक चाचण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. रसीची सुरक्षितता आणि परिणामकारकता यांची तपासणी करण्यात आलेली नाही. तज्ज्ञ समितीपुढे केलेल्या सादरीकरणातून या गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. अत्यावश्‍यक चाचण्या बाजूला सारून लसीला परवानगी कशी काय देण्यात आली, याचे स्पष्टीकरण आरोग्य मंत्रालयाने द्यावे. कोरोनायोद्ध्यांना पहिल्या टप्प्यात ही लस देण्यात येणार आहे, त्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे या प्रश्‍नांची उत्तरे मिळायला हवीत.’’ 

गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या संसर्गाचा फटका बसलेल्या भारतातासाठी लस तयार होणे ही दिलासादायक बाब आहे. यासाठी काम करणाऱ्या सर्व शास्त्रज्ञ, संशोधक आणि संस्था अभिनंदनास पात्र आहेत, असेही शर्मा यांनी म्हटले आहे. 

शशी थरूर यांनीही तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचाच मुद्दा उपस्थित केला. चाचण्या पूर्ण न होताच दिलेली मंजुरी धोकादायक ठरू शकते. चाचण्या पूर्ण होईपर्यंत थांबायला हवे होते, तोपर्यंत कोव्हिशिल्डच्या लसीचा वापर करायला हवा होता, असे थरूर यांनी म्हटले आहे. 

काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी ट्विट करून सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, भारत बायोटेक हा प्रथम श्रेणीतील उद्योग आहे. परंतु, त्यांनी तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांबाबतची आंतरराष्ट्रीय मानके या कंपनीसाठी का बदलण्यात आली, हे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले पाहिजे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पगारापेक्षा खर्च जास्त! PSI देऊ शकला नाही ४४ लाखांचा हिशोब, गुन्हा दाखल

Pancreatic Cancer Symptoms : पोटाच्या वरच्या भागात दुखून पाठदुखी सुरू होतेय? स्वादुपिंडाच्या कर्करोगाची 'ही' लक्षणे अजिबात हलक्यात घेऊ नका, तज्ज्ञांनी काय दिला इशारा?

Illegal Hoardings: शहराला बेकायदा होर्डिंगचा विळखाशहराला बेकायदा होर्डिंगचा विळखा ,मुख्यमंत्र्यांची पुण्याला शाबासकी, संभाजीनगरवर छडी कधी उगारणार?

Marathi News Live Updates: महिलांचा आदर असेल तर विधेयकाला पाठिंबा द्या- नरेश म्हस्के

Water Crisis: तहानलेल्या गावांची संख्या साडेपाचशेवर! ,मराठवाड्यात ८५० टँकरने पाणीपुरवठा, दीड हजार विहिरींचे अधिग्रहण

SCROLL FOR NEXT