Congress Meeting with leaders of Maharashtra in Delhi 
देश

आघाडी की स्वबळ यावर काँग्रेसचे चिंतन

महाराष्ट्रातील नेत्यांसोबत दिल्लीत आज बैठकीचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : महाराष्ट्रात स्वबळावर लढण्याच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या घोषणेनंतर ‘आघाडी की एकला चलो रे’ हा पक्षातील गोंधळ निस्तरण्यासाठी (ता. २७) प्रदेश आणि केंद्रीय काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक दिल्लीत होणार आहे. मुंबई महापालिकेत भाजपला रोखण्यासाठी यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घ्यावे, अशी भूमिका काँग्रेसच्या अन्य नेत्यांची आहे.

महाराष्ट्रातील सत्ताबदलानंतर भाजपने मुंबई महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच मुंबईच्या दौऱ्यामध्ये महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकताना उद्धव ठाकरेंना धडा शिकविण्याचे विधान केले होते.

त्यानंतर भाजपने शिंदे गटाच्या मदतीने या निवडणुकीची आखणीही केली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या महापालिका निवडणुकीत भाजपला रोखण्याचीच काँग्रेसची भूमिका असली पाहिजे, असे पक्षातील नेते म्हणत आहेत. यावर, खासगीत बोलताना काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने प्रदेश काँग्रेस नेतृत्वाच्या स्वबळाच्या भाषेवर आश्चर्य व्यक्त केले. महाविकास आघाडी होणे किंवा न होणे हा मुद्दा बाजूला ठेवून भाजपला रोखणे यालाच प्राधान्य हवे, असे मतप्रदर्शन या नेत्याने केले.

या पार्श्वभूमीवर, आगामी निवडणुकीच्या मुद्द्यावर राज्यातील नेत्यांची बैठक संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांच्यासमवेत उद्या काँग्रेस मुख्यालयात बैठक होणार आहे.

खर्गे, मोहन प्रकाश यांच्याशी चर्चा नाही?

या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बोलावण्यात आले आहे. त्यांच्यासोबतच दिल्लीत असलेले महाराष्ट्रातील काँग्रेस नेते यांचीही मते जाणून घेण्यात येणार असल्याचे समजते. अर्थात, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, मोहन प्रकाश या महाराष्ट्राच्या माजी प्रभारींशी चर्चा होणार की नाही याबाबत पक्षातून काहीही कळाले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians च्या ताफ्यात 'हे' ४ खेळाडू घेऊ शकतात हार्दिक पांड्याची जागा! CSK, KKR सोडून अन्य पर्यायाचा विचार; कोण आहेत ते?

पुण्याहून मुंबईकडे निघाले, मिसिंग लिंकवर येताच होत्याचं नव्हत झालं; पुण्यातील युवा काँग्रेस नेत्याचा मृत्यू, मध्यरात्री काय घडलं?

हिंदी मालिकांमध्ये काम करणाऱ्या लोकांना किती पैसे मिळतात? पंकज विष्णू यांनी सांगितला आकडा

Marathi News Live Updates : कुणबी दाखले पारदर्शकतेने देण्याचे काम सुरु- राधाकृष्ण विखे पाटील

Raju Shetty: ६० वर्षांचा वनवास संपवा! पवना धरणग्रस्त आक्रमक; राजू शेट्टींचा जलसमाधी आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT