Congress MLA Rape Remark  google
देश

''बलात्काराची मजा घ्या'', आक्षेपार्ह वक्तव्यानंतर काँग्रेस नेत्यानं मागितली माफी

सकाळ डिजिटल टीम

कर्नाटक विधानसभेचे माजी स्पीकर आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते के. आर. रमेश कुमार (Congress MLA K. R. Ramesh Kumar) यांनी विधानसभेत आक्षेपार्ह विधान केलं होतं. ''बलात्कार टाळता येत नाही तेव्हा त्याची मजा घ्या'', असं धक्कादायक वक्तव्य त्यांनी केलं होतं. आता याबाबत त्यांनी विधानसभेत माफी मागितली आहे.

माझ्या वक्तव्यामुळे महिलांच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागण्यात माझी काहीही हरकत नाही. मी मनापासून माफी मागतो, असं काँग्रेस नेते के. आर. रमेश कुमार म्हणाले. त्यानंतर विधानसभा स्पीकर विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी कुमार यांच्या सुरात सूर मिसळत त्यांनी माफी मागितली आहे; त्यामुळे विषय आता पुढे वाढवण्याची गरज नाही, असं म्हटलं.

नेमकं काय आहे प्रकरण? -

विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आमदारांनी सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी मागितली होती. त्यावेळी काँग्रेस नेते रमेश यांनी बलात्काराबाबत धक्कादायक वक्तव्य केलं. ''बलात्कार टाळता येत नाही तेव्हा झोपा आणि त्याची मजा घ्या'' असं वक्तव्य केलं. त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाला विरोध करण्याऐवजी कर्नाटक विधानसभा अध्यक्ष आणि विधानसभेतील सदस्यांमध्ये हशा पिकला.

रमेश यांनी यापूर्वीही केलं होतं वक्तव्य -

कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष असताना रमेश यांनी स्वत:ची तुलना बलात्कार पीडितेशी केली होती. न्यायालयात उलटतपासणी होताना जसा बलात्कार पीडितेवर पुन्हा पुन्हा बलात्कार होत असल्याचा असंवेदनशील विनोद करत ते म्हणाले होते की, "मला बलात्कार पीडितेसारखे वाटतं." त्यावेळी महिला आमदारांनी या असंवेदनशील विधानाचा निषेध केला होता. त्यानंतर त्यांनी माफी मागितली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: DJ बंदीच्या मागणीवर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकार विद्यानंद बापट यांच्यासोबत...

IND vs WI : श्रेयस अय्यर वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेतून OUT! नेमकं काय कारण अन् कोण असतील भारताचे १५ शिलेदार?

Sainik Takli MIDC controversy : आमदार यड्रावकरांनीच सैनिक टाकळी एमआयडीसीचा घाट घातला? शिरोळ तहसील कार्यालयात आंदोलकांचे गंभीर आरोप; संभाजी भिडेंनी केलं नेतृत्व

Safe Investment: 2,000 रुपायांची छोटी बचत बनवेल 1.42 लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसची ही योजना पाहिली का?

Shani Sade Sati 2026 : शनीची साडेसाती बिघडवणार गेम! 2026 मध्ये 'या' 3 राशींवर राहणार शनीची नजर; वाचा तुमचा टप्पा कोणता?

SCROLL FOR NEXT