

Mumbai Rain
ESakal
मुंबई : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबईकरांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. मात्र आता उन्हाच्या झळांपासून हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाल्याची बातमी समोर आली आहे. मुंबईत आज सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. मात्र अचानक पडलेल्या या पावसामुळे मुबईकरांची तारांबळ उडाल्याचे दिसून येत आहे.