sonia gandhi sakal
देश

मंत्र्यांवर नाराज आमदारांनी घेतली सोनिया गांधींची भेट; केली 'ही' महत्वाची मागणी

राज्यातील काँग्रेसच्या मंत्र्यांवर आमदार नाराज असल्याचं बोललं जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राज्यातील नाराज आमदारांनी आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीत आमदारांनी राज्यातील काही मंत्र्यांविरोधात थेट हायकमांड तक्रार केली. आपल्या तक्रारी ऐकूण घेतल्यानंतर ही भेट समाधानकारक झाली असल्याचं या आमदारांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. (Congress MLA meet Sonia Gandhi make an important demand)

काँग्रेस अध्यक्षांकडे तक्रार करताना आमदार म्हणाले, बजेटमध्ये मंत्र्यांच्या मतदारसंघातच जास्त निधी दिला जातो. काँग्रेसच्या वाटेला येणाऱ्या निधीपैकी ७० टक्के निधी या मंत्र्यांनी स्वतः मतदारसंघासाठी घेतला. इतर आमदारांच्या वाटेल फक्त तीस टक्के निधी आला. त्यामुळं राज्याच्या मंत्रिमंडळात बदल केले पाहिजेत. पक्षाचे मंत्री आमदारांची काम करत नसल्यानं मंत्रिमंडळात बदल अपेक्षित आहे.

दरम्यान, सोनिया गांधी यांनी या सर्वा नाराज आमदारांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर त्यांना लिखित स्वरूपात तक्रारी देण्याच्या सूचना केल्या. ज्यांना काही सांगायचं आहे त्यांनी ते लिखित स्वरुपात द्यावं असं सोनिया गांधी यांनी आमदारांना सांगितलं, अशी माहिती या भेटीला उपस्थित असलेल्या काही आमदारांनी दिली.ाँग्रेस आमदारांनी घेतली सोनिया गांधींची भेट; केली 'ही' महत्वाची मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गणेशोत्सवाची आठवडाभर सुट्टी; मात्र गुजराती, कॉन्व्हेंट शाळांचा सुट्टी देण्यास नकार, शिक्षण विभागाचे कारवाईचे संकेत

'ठरलं तर मग' मालिका अर्जुन सुभेदार सोडणार? अमित भानुशाली पात्राबद्दल बोलताना म्हणाला, 'आता वेळ आलीय, मी आयुष्यभर...'

Weekly Horoscope September 2026 : सप्टेंबर १४ ते २० दरम्यान ‘या’ ५ राशींसाठी लॉटरी; नशिबाची जोरदार साथ मिळणार

Marathi News Live Updates : तिसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडीचा फटका; माणगाव-इंदापूर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा

Amravati Jail news : आठवड्याभरात तिसऱ्या बंदीचा मृत्यू ;जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील घटनेमुळे खळबळ

SCROLL FOR NEXT