Adhir Ranjan Chaudhary 
देश

Adhir Ranjan Chaudhari: अधीर रंजन चौधरींचं निलंबन मागे; काँग्रेसचा आक्रमक चेहरा लोकसभेत पुन्हा परतणार

पावसाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान चौधरी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरींचं यांचं निलंबन मागे घेण्यात आलं आहे. लोकसभा सचिवालयानं याबाबतचं अधिकृत पत्र प्रसिद्ध केलं आहे. यामुळं चौधरी पुन्हा एकदा आक्रमकपणे काँग्रेसची बाजू संसदेत मांडताना दिसतील. (Congress MP Adhir Ranjan Chowdhury suspension from Lok Sabha revoked)

बुधवारी (३० ऑगस्ट) रोजी लोकसभेच्या समितीपुढं अधीर रंजन चौधरींनी आपली बाजू मांडली होती. त्यानंतर त्यांचं निलंबन रद्द करण्याची शिफारस मंजूर करण्यात आली होती. अविश्वास प्रस्तावावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात केलेल्या विधानामुळं चुकीच्या वर्तानाचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यानंतर अधीर रंजन चौधरी यांनी विशेषाधिकार समितीकडं धाव घेतली होती. (Latest Marathi News)

लोकसभेच्या समितीनं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडं चौधरींचं निलंबन रद्द करुन त्यांना खासदारकी पुन्हा बहाल करण्याची शिफारस केली होती. यावर आता लोकसभा सचिवालानं त्यांना पुन्हा खासदारकी बहाल केली आहे. (Marathi Tajya Batmya)

आपल्यावरील कारवाईचा निषेध करताना अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं होतं की, निलंबनाच्या कारवाईची गरज नव्हती. कारण कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता. मी केलेली विधानं जर चुकीची वाटत होती तर ती कामकाजातून हटवता आली असती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT