Dhiraj Sahu Esakal
देश

Dhiraj Sahu On IT Raid: ३५३ कोटींची रोकड सापडल्यानंतर धीरज साहू यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, पैसा काँग्रेसचा नाही तर...

इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडून कारवाई करण्यात आल्यानंतर साहू यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित कणसे

Dhiraj Sahu On IT Raid:  सहा डिसेंबर रोजी इन्कम टॅक्स विभागाने काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याशी संबंधीच ठिकाणांवर छापेमारी केली. या छाप्यांमध्ये पैशांनी भरेलेले तब्बल १७६ बॅग सापडले आहेत. ही रक्कम मोजण्यासाठी ४० मशीन पाच दिवस काम सुरू होतं. या मोजणीत काँग्रेस खासदाराकडे ३५३ कोटी रुपये सापडल्याचे समोर आले. या छापेमारीनंतर पहिल्यांदाच धीरज साहू हे कॅमेऱ्यासमोर आले. साहू यांनी अखेर हा पैसा कोणाचा आहे, याबद्दल खुलासा केला आहे. सोबतच हे काळा पैसा आहे का याबद्दल देखील उत्तर दिलं आहे.

भाजपकडून सापडलेला पैसा काळं धन असल्याचा आरोप केला जातो आहे, याबद्दल धीरज साहू यांना विचारण्यात आलं तेव्हा साहू यांनी सांगितलं की, आमचे जेवढे उद्योग आहेत, त्या सगळ्या फर्म माझ्या कुटुंबियांच्या नावावर आहेत. ते लोक (भाजप) याला कसे काळा पैसा म्हणत आहेत याबद्दल इनकम टॅक्स विभागच सांगू शकतो. तो काळा पैसा की पांढरा याबद्दल इनकम टॅक्स विभागाचं उत्तर येऊ द्या. मी बिझनेस करत नाही... माझ्या कुटुंबातील लोक याची उत्तरं देतील. मी या प्रकरणातून पूर्णतः दूर आहे. माझं कुटुंब खूप मोठं आहे. मी राजकारणात ३०-३५ वर्षांपासून आहे. याखेरीज मला अधिक काहीच बोलायचं नाही.

धीरज साहू यांना या छापेमारीचा काँग्रेस पक्षासी संबंध आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला, यावर बोलताना त्यांनी उत्तर दिलं की, हा इनकम टॅक्सचा झापा आहे. लोक याकडे कशा पद्धतीने पाहात आहेत माहिती नाही. मी कुठल्याही पक्षावर आरोप लावत नाहीये.मात्र मी सांगू शकतो की हा पैसा काँग्रेस पक्षाचा किंवा दुसऱ्या कुठल्या पक्षाचा नाहीये, आणि मी हे मी ठामपणे सांगत आहे.

इनकम टॅक्स विभागाने खासदार धीरज साहू यांच्याशी संबंधीत अनेक ठिकाणांवर छापेमारी केली होती. हे छापे तीन राज्यात मारण्यात आले. या छाप्यांनंतर एकूण ३५३ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच कारवाईत इतक्या मोठ्या प्रणाणावर पैसे जप्त करण्यात आले आहेत. या छापेमारीनंतर धीरज साहू यांनी पहिल्यांदाच वक्तव्य केलं असून त्यांनी हा पैसै आपल्या कुटुंबियांचा असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

Pune News : महापालिकेच्या सर्वपक्षीय कार्यालयांच्या सुशोभिकरणासाठी लाखोची उधळपट्टी

Latest Marathi News Update: राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Shirur Accident : पुणे-नगर रस्त्यावर एसटी बसच्या धडकेत दूचाकीस्वार तरूणाचा मृत्यु

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

SCROLL FOR NEXT