Congress MP Rahul Gandhi Visit Virender Arya Akhara interacting with wrestlers including Bajrang Poonia and others  
देश

Rahul Gandhi News : राहुल गांधी भल्या पहाटे कुस्तीच्या आखाड्यात; थेट बजरंग पुनियासोबत केले दोन हात

कुस्तीपटूंचा कुस्ती महासंघासोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी अचानक आखाड्यात पोहचले, त्यांनी यावेळी खेळाडूंसोबत व्यायम देखील केला.

रोहित कणसे

कुस्तीपटू आणि भारतीय कुस्ती महासंघ यांच्यात सुरू असलेल्या वादाचा मुद्दा चर्चेत आहे. यादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी हे बुधवारी (27 डिसेंबर) पहाटे हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील छारा गावात पोहोचले. येथे त्यांनी वीरेंद्र आर्य आखाड्यात जाऊन बजरंग पुनिया आणि इतर पैलवानांची भेट घेतली.

छारा हे पैलवान दीपक पुनिया यांचे गाव. दीपक आणि बजरंग यांनी त्यांच्या कुस्ती कारकिर्दीला वीरेंद्र आखाड्यापासूनच सुरुवात केली. आखाड्यातील राहुल गांधी यांचे फोटोही समोर आला आहे, ज्यामध्ये तो कुस्तीपटूंसोबत बसलेले दिसत आहेत.

भारतीय कुस्ती महासंघाबाबत (WFI) वाद सुरू असताना राहुलने कुस्तीपटूंची भेट घेतली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने नुकतीच WFI ची नवीन संस्था रद्द केली. एवढेच नव्हे तर नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंह यांनाही निलंबित करण्यात आले. संजय सिंह हे भाजप खासदार आणि WFI चे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे जवळचे मानले जातात. ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे.

बजरंग पुनिया सोबत खेळली कुस्ती

राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर बजरंग पुनिया यांना काँग्रेस नेते राहुल गांधी इथे का आले होते? तेव्हा पुनियाने सांगितले की, त्यांना आमची दैनंदिन कुस्तीची दिनचर्या समजून घेतली आणि पाहिली. त्यांनी कुस्तीही खेळली आणि व्यायामही केला. पुनियाने सांगितले की, राहुल गांधी यांनी त्याच्यासोबत कुस्ती देखील खेळली. एका पैलवानाचा दिनक्रम पाहण्यासाठी येथे आले होते असे बजरंग पुनियाने सांगितले.

राहुल गांधींची अचानक आखाड्याला भेट

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी वीरेंद्र आर्य आखाड्याला भेट दिली तेव्हा कुस्ती प्रशिक्षक वीरेंद्र आर्य म्हणाले की, राहुल गांधी येत असल्याबद्दल आम्हाला कोणीही सांगितले नाही. आम्ही येथे सराव करत होतो आणि तो अचानक आले... ते जवळपास येथे सकाळी 06:15 वाजता येथे पोहोचले ...त्ंयीने आमच्यासोबत व्यायाम केला आणि मग त्यांनी आम्हाला त्यांच्या व्यायामाबद्दल आणि खेळाबद्दल सांगितले. त्यांना खेळाबद्दल भरपूर ज्ञान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT