Congress MP Rajani Patil esakal
देश

Congress : स्वातंत्र्य सैनिकांच्या घरातून आलोय, अपमान सहन करणार नाही; कारवाईनंतर रजनी पाटील आक्रमक

पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान विरोधकांचा गोंधळ चित्रित केल्याप्रकरणी काँग्रेस खासदार रजनी पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आली.

सकाळ डिजिटल टीम

Congress MP Rajani Patil : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या (Sonia Gandhi) विश्वासू अशी ओळख असणाऱ्या राज्यसभा खासदार रजनी पाटील यांना सभापती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी आज (शुक्रवार) निलंबित केलं.

सभागृहाच्या कामकाजाचं चित्रीकरण केल्याबद्दल सभापती धनखड यांनी काँग्रेस खासदार पाटील (Rajni Patil) यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित कामकाजाकरिता निलंबित केलं. केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी पाटील यांच्या या कृतीवर आक्षेप घेतला होता.

पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान विरोधकांचा गोंधळ चित्रित केल्याप्रकरणी काँग्रेस खासदार रजनी पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आली. आपण स्वातंत्र्य सैनिकांच्या घरातून आलो आहोत. सभागृहातला हा अपमान सहन करणार नाही, उर्वरित अधिवेशन काय, पूर्ण टर्म निलंबित करा हवं तर अशी प्रतिक्रिया रजनी पाटील यांनी कारवाईनंतर दिलीये.

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर म्हणाले, आज ट्विटरवर या सभागृहाच्या कार्यवाहीशी संबंधित व्हिडिओ प्रसारित करण्यात आला. मी त्याचा गांभीर्यानं विचार केला आणि आवश्यक ते सर्व केलं. तत्त्वानुसार आणि संसदेचे पावित्र्य राखण्यासाठी कोणत्याही बाहेरील एजन्सीचा सभागृहाच्या कामकाजात सहभाग मागता येणार नाही, त्यामुळं रजनी पाटील यांना निलंबित करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवाशांना दिलासा! ठाणे–मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक पूर्ण होणार; रेल्वेमंत्र्यांचे आश्वासन

U19 Asia Cup: पुन्हा भारत - पाकिस्तान फायनल! कधी आणि कुठे पाहाणार लाईव्ह सामना? जाणून घ्या एका क्लिकवर

Baba Bageshwar warning : ‘’.. तर या देशातील हिंदू १९९२ ची पुनरावृत्ती करण्यास तयार आहेत’’ ; बाबा बागेश्वर यांचा इशारा!

मुंबईतील चाळीत राहणाऱ्या तीन मित्रांची धमाल गोष्ट; 'गोट्या गँगस्टर'चा ट्रेलर लाँच, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Ambegaon News : बिबट्याच्या दहशतीने आंबेगाव तालुक्यातील धार्मिक-सामाजिक जीवन ठप्प; भाविकांमध्ये भीतीचे सावट!

SCROLL FOR NEXT