Congress Nana Patole claims BJP vandalizes Bharat Jodo Nyay Yatra banners Congress vehicles in Assam  
देश

Bharat Jodo Nyay Yatra Attack : आसाममध्ये 'भारत जोडो न्याय यात्रेचे' बॅनर्स, गाड्यांची तोडफोड; काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रेचा आज सहावा दिवस आहे, सध्या ही यात्रा आसामधून जात आहे.

रोहित कणसे

Bharat Jodo Nyay Yatra Attack : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रेचा आज सहावा दिवस आहे, सध्या ही यात्रा आसामधून जात आहे. मागील सहा दिवसांपासून राहुल गांधी यांनी मणिपूर आण नागालँडसह आसामच्या अनेक भागांमधून प्रवास करत आहेत. यादरम्यान काँग्रेसकडून भाजपवर गंभीर आरोप केला आहे. आसाममध्ये भाजपच्या गुंडांनी भारज जोडो न्याय यात्रेचे बॅनर्स फाडत गाड्यांची तोडफोड केल्याचा आऱोप केला आहे

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी यासंबंधी एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला आहे. यामध्ये पटोले यांनी सांगितलं की, काल आसाममध्ये भाजपाई गुंडांकडून भारत जोडो न्याय यात्रेचे बॅनर्स, गाड्यांच्या ताफ्याची, तोडफोड करण्यात आली, त्यांना एकच सांगणे आहे, तुम्ही कितीही द्वेष करा, आम्ही प्रेमाने, लोकशाही मार्गानेच पुढे जाऊ, हा भारताचा प्रवास आहे, अन्यायाविरुद्ध न्यायाचा प्रवास आहे, 'भारत जोडो न्याय यात्रा' कुठलीही शक्ती थांबवू शकत नाही! असे पटोले म्हणाले आहेत.

यासोबोत एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये रात्री गाड्यांची तोडफोड करातनाचे, तसेच पोस्टर फाडले जात असतानाच्या क्लीप्स दाखवण्यात आल्या आहेत.

काँग्रेसच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून देखील हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यासोबत आसामच्या लखीमपूर येथे भारत जोडो यात्रेच्या गाड्यांच्या ताफ्यावर भाजपच्या गुंडांनी हल्ला केला. भाजपच्या गुंडांनी भारत जोडो यात्रेचे पोस्टर-बॅनर आणि गाड्यांची तोडफोड केली. हा प्रकार भेकड आणि लाजीरवाना प्रकारामुळे भारत जोडो यात्रेला मिळत असलेलं प्रेम आणि समर्थन पाहून भारतीय जनता पक्ष घाबरला आहे.

मात्र मोदी सरकार आणि त्यांच्या इशाऱ्यावर चालणारे आसामचे मुख्यमंत्री यांनी लक्षात ठेवावं की ही भारताची यात्रा आहे. अन्यायाविरोधात न्यायाची यात्रा आहे. भारत जोडो न्याय यात्रेला कोणतीही ताकद रोखू शकत नाही. ही यात्रा न्याय मिळेपर्यंत सुरूच राहणार आहे, असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Department : गुन्हेगारी कमी कशी व्हायची? मोक्का रद्द करतो, गुन्हेगारांच्या टोळीकडे पोलिसानेच मागितले ६५ लाख; सहाय्यक फौजदार निलंबित

दुर्मीळ घटना! नवजात बाळाच्या पोटात आढळला दुसरा गर्भ; जगभरात फक्त 200 प्रकरणांमध्ये नोंद, काय म्हणाले डॉक्टर?

Latest Marathi News Live Update : महायुती सरकारचा 'आनंदाचा शिधा' बंद शक्यता, कारण काय?

Solapur News: 'मूर्तिकारांच्या अतिक्रमित २० झोपड्या जमीनदोस्त'; महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक, मंडई विभागाची संयुक्त कारवाई

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

SCROLL FOR NEXT