Sonia Gandhi Corona Positive esakal
देश

ED चौकशीला जाण्याआधीच सोनिया गांधींना कोरोनाची लागण

सकाळ डिजिटल टीम

सोनिया गांधी यांना काल सायंकाळी सौम्य ताप आला होता.

Sonia Gandhi Corona Positive : सोनिया गांधींना (Sonia Gandhi) कोरोनाची (Coronavirus) लागण झालीय. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी ही माहिती दिलीय. सुरजेवालांनी असंही सांगितलंय की, यापूर्वी सोनिया गांधी ज्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भेटल्या होत्या, त्यापैकी अनेकांना कोरोनाची लागण झालीय.

सुरजेवाला यांच्या म्हणण्यानुसार, 'सोनिया गांधींना काल (बुधवार) सायंकाळी सौम्य ताप आला होता, त्यानंतर कोविड चाचणीत त्या पॉझिटिव्ह आल्या. ते पुढं म्हणाले, सोनिया गांधींनी सध्या स्वत:ला वेगळं केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिवाय, त्यांची प्रकृती ठीक आहे.'

8 जूनपूर्वी सोनिया गांधी बऱ्या होतील, अशी आशा सुरजेवालांनी व्यक्त केलीय. 8 जून रोजी अंमलबजावणी संचालनालयानं (ED) त्यांना चौकशीसाठी बोलावलंय. नॅशनल हेराल्डशी संबंधित प्रकरणात ही चौकशी होणार आहे. सोनिया गांधी दोन-तीन दिवसांत बरे होण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, घरांमध्ये शिरलं पाणी; काही ठिकाणी गारपीट

Latest Marathi News Live Update : बाणेर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूकीस अडथळा

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

He Kay Navin Review: 'हे काय नवीन' मध्ये खरंच काही नवीन आहे का? कशी आहे प्रिया उमेशची नवी वेब सीरिज?

Samruddhi Expressway Accidents : काय आहे 'हायवे हिप्नोसिस'? समृद्धीवर का होतायत अपघात? पूल ठरतात धोकादायक!

SCROLL FOR NEXT