Rahul Gandhi News esakal
देश

Congress : काँग्रेस राष्ट्रीय पक्ष राहिला नाही, त्यामुळे त्यांनी...; मुख्यमंत्र्यांच्या लेकीचा दावा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या आणि भारत राष्ट्र समितीच्या नेत्या कल्वाकुंतला कविता यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेस हा आता राष्ट्रीय पक्ष राहिलेला नाही. आश्चर्याची बाब म्हणजे काँग्रेस आपला अहंकार सोडून वास्तवाला कधी सामोरे जाणार?, असा सवालही त्यांनी केला.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला भाजपचा पराभव करायचा असेल, तर त्यांनी ‘टीम प्लेयर’प्रमाणे काम केले पाहिजे. तसेच प्रादेशिक पक्षांशी जुळवून घेतलं पाहिजे.

महिला आरक्षण विधेयकाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी के. कविता दिल्लीत आहेत. या दरम्यान त्या कथित दिल्ली मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयासमोर (ईडी) हजर राहणार आहेत.

याआधी मुंबईत माध्यमांशी बोलताना के. कविता म्हणाल्या होत्या की, "देशात एकच आघाडी आहे, ती म्हणजे भाजप. दुसरी आघाडी काँग्रेस पूर्णपणे रिकामी आहे, तंबू नाही, आघाडी नाही, काहीही नाही. जो काही पर्याय असेल, तो दुसरी आघाडी असेल. केसीआरसाहेब गेल्या अनेक वर्षांपासून या प्रयत्नात गुंतले आहेत, ते सर्व प्रादेशिक पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यापुढेही हे प्रयत्न सुरूच राहतील, आम्ही महाराष्ट्रात येत राहू, असंही कविता यांनी म्हटलं होतं.

तेलंगणमध्ये विधानसभा निवडणुका असल्याने केंद्र सरकार सातत्याने आपल्या एजन्सी राज्यात पाठवत असल्याचा आरोप कविता यांनी केला. निवडणुकीचे वर्ष असल्याने आयकर विभागाने तेलंगणात ५००, सीबीआयने १०० आणि ईडीने २०० छापे टाकले, असंही कविता यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bailgada Sharyat: वेग, ताकद अन् जिद्दीला अखेरचा निरोप! पुणे जिल्ह्यात दबदबा असलेल्या ओम्या बैलाचं निधन

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Marathi News Live Updates : जर आमच्या निदर्शनास आले की कोणी हिंदीत बोलत आहे किंवा उद्धटपणे वागत आहे, तर आम्ही त्यांना मारू - अमित ठाकरे

Pune Traffic Issue : वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती; ‘रिअल टाइम डेटा’नुसार होणार अभ्यास

SCROLL FOR NEXT