Congress policy statement Himachal Pradesh development Sakal
देश

India China Faceoff : आता वेळ आलीय…; तवांगमधील सैन्य झटापटीवर काँग्रेसही झाली आक्रमक

सकाळ डिजिटल टीम

अरुणाचल प्रदेशमध्ये भारत आणि चीनच्या सैनिक एकमेकांना भिडल्याची घटना समोर आली आहे. या चकमकीत दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. ही चकमक 9 डिसेंबरला तवांगजवळ झाली. यादरम्यान भारतीय जवानांनी चीनला चोख प्रत्युत्तर दिले. ऑक्टोबर 2021 मध्ये अरुणाचल प्रदेशातील यांगसे येथे देखील दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये वाद झाला होता.

दरम्यान कॉंग्रेसकडून प्रतिक्रिया दिली आहे. अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये भारत-चीन सैनिक एकमेकांना भिढल्याची माहिती समोर येत आहे. आता वेळ आली आहे की सरकारने आता गुळगुळीत भूमिका सोडून चीनला कठोर शब्दात सांगावे की त्यांची अशी वर्तवणूक सहन केली जाणार नाही, असे म्हटले आहे.

लष्कराच्या उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले की, 9 डिसेंबर 2022 रोजी तवांग सेक्टरमध्ये एलएसीजवळ पीएलए सैनिकांशी चकमक झाली होती. आपले सैनिक धैर्याने लढले. समोरासमोर झालेल्या या लढतीत दोन्ही बाजूंच्या काही जवानांना किरकोळ दुखापत झाली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 जवानांना उपचारासाठी गुवाहाटी येथे आणण्यात आले आहे.

हेही वाचा - सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

या चकमकीत भारताचे 30 हून अधिक जवान जखमी झाले आहेत. अनेक चिनी सैनिकही जखमी झाले आहेत. दरम्यान चीनी सैनिकांची संख्या जास्त असल्याचे सांगितले जात आहे. भारताचा एकही सैनिक गंभीर जखमी नसला तरी. या चकमकीनंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताच्या कमांडर्सनी चीनच्या कमांडर्ससोबत फ्लॅग मीटिंग घेतली. त्यानंतर दोन्ही देशांचे सैनिक मागे हटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डीले यांचं निधन, वयाच्या ६६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Manoj Jarange: बीडमध्ये होणारा ओबीसी मेळावा राष्ट्रवादी पुरस्कृत; मनोज जरांगे यांची टीका, राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न

Pro Kabaddi 2025: पराभवाची व्याजासह परतफेड! यू मुंबाचा तेलुगू टायटन्सवर दणदणीत विजय

Panchang 17 October 2025: आजच्या दिवशी ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

Pune Weather Update: अति हलक्या पावसाची पुणे परिसरात शक्यता

SCROLL FOR NEXT