कर्नाटकातील गुलबर्गा सरकारी महाविद्यालयात स्टुडंट युनियनचा नेता बनून राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केलेल्या मल्लिकार्जुन खर्गे यांची आता काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदी निवड झाली आहे. खर्गे यांचा जन्म बिदर जिल्ह्यातील वारावट्टी गावात २१ जुलै १९४२ ला झाला. त्यांचे वडील मापण्णा आणि आई सबव्वा या होत. गुलबर्गा नूतन विद्यालयात त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. तर गुलबर्गा सरकारी महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेची पदवी घेतली. गुलबर्ग्यातीलच सेठ शंकरलाल लाहोटी कायदा महाविद्यालयातून ते कायद्याचे पदवीधर झाले. त्यानंतर वकिलीला प्रारंभ सुरू केला.गुलबर्गा सरकारी महाविद्यालयातून स्टुडंट युनियनचा नेता म्हणून आपल्या राजकीय जीवनाला प्रारंभ केला. जनरल सेक्रेटरी म्हणून त्यांनी निवड झाली. १९६९ ला एमएसके मिल्स कामगार युनियनचे कायदा सल्लागार बनले. त्याचवर्षी भारतीय राष्र्टीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि गुलबर्गा शहर काँग्रेस समिती अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली.
कर्नाटक विधानसभेसाठी १९७२ ला पहिल्यांदाच त्यांनी गुरमितकल (जि. गुलबर्गा) विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली आणि जिंकलीही. जकात रद्द कमिटीचे अध्यक्ष, चर्मोद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून लक्षणीय काम केले. तत्कालीन मुख्यमंत्री देवराज अर्ज यांनी १९७६ ला त्यांना मंत्रिमंडळात संधी देताना प्राथमिक शिक्षण खात्याचे राज्यमंत्री बनवले.गुरमितकलमधून १९७८ ला दुसऱ्यांदा निवडणूक लढवली. पुन्हा मुख्यमंत्री अर्स यांनी त्यांच्याकडे ग्रामीण विकास आणि पंचायत राज खात्याचे राज्यमंत्री खात्याची जबाबदारी दिली. १९८० ला मुख्यमंत्री गुंडू राव यांच्या मंत्रिमंडळात बढती मिळून ते महसूल खात्याचे कॅबिनेट मंत्री बनले.
जमीन पुनर्रचना या अतिशय संवेदनशील मुद्यावर काम करताना हजारो कामगार, शेतमजूर, भूमीहीनाना मोठा लाभ मिळवून दिला. केंद्रात रेल्वेमंत्री, कामगारमंत्री, कर्नाटक प्रदेश अध्यक्ष म्हणून काम केले आहे. खर्गे यांनी सलग नऊ वेळा गुरमितकल या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली. गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा ते खासदार बनले. एकमेव ऐतिहासिक पराभव खर्गे २००९ ला लोकसभा निवडणुकीत गुलबर्गामधून विजय मिळविला. २०१४ ला ते निसटत्या म्हणजे केवळ तेरा हजार मतांनी गुलबर्गा लोकसभा निवडणूक जिंकली. पण २०१९ ला भाजपचे उमेदवार उमेश जी. जाधव यांनी खर्गेंचा ऐतिहासिक पराभव केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.