MP Suspension sakal
देश

MP Suspension: संसदेत नाही, तर कुठे बोलणार? मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी-शहांना थेट सवाल

खासदार निलंबनाच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी संसदेच्या बाहेर आंदोलन केले. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- खासदार निलंबनाच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी संसदेच्या बाहेर आंदोलन केले. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, संसदेत बोलणार नाही तर कुठे बोलणार. पंतप्रधान मोदी, अमित शहा संसदेच्या बाहेर बोलत असतात. पण, त्यांना संसदेत बोलायला काय अडचण आहे.

संसद चालावं असं सत्ताधाऱ्यांना वाटत नाही. सभापतींनी एक मुद्दा उपस्थित करुन जातीयवादाचे वळण दिलं आहे. आम्ही लोकशाहीमध्ये निवडून आलेले सदस्य आहोत. लोकांचे प्रश्न उपस्थित करणे आमचा हक्क आहे. संसदेच्या सुरक्षाभंगाबाबत आम्हाला काही उत्तरं मिळण्याच अपेक्षा होती. तुम्ही संसदेत बोलणार नाही तर कुठे बोलणार आहात. मोदी-शहा कोणीच संसदेत येऊन बोललं नाही, असं खरगे म्हणाले.

नियमानुसार मोदी-शहांनी संसदेत बोलणं आवश्यक आहे. पण, ते इतर ठिकाणी बोलत होते. हे दुर्दैवी आहे. आम्ही लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांना विनंती करतो, की त्यांनी आम्हाला बोलू द्यावं. संसदेत अमित शहा यांनी निवेदन द्यावं. सत्ताधाऱ्यांना चर्चाच नकोय. लोकशाहीसाठी हा धोका आहे, असं खरगे म्हणाले.

भविष्यात पण अशा घटना घडू शकतात. पंतप्रधान मोदी पुढील १०० वर्षांसाठी सत्तेत राहणार नाहीत. त्यामुळे लोकशाहीचं भाजपने पालन करावं. इंडिया आघाडीचे नेते गुरुवारी जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करणार असल्याची माहिती खरगेंनी दिली. संसदेबाहेरील आंदोलनात इंडिया आघाडीचे सर्व नेते जमा झाले आहेत. संसदेतून १४४ खासदारांचं निलंबन झाल्याचा निषेध करण्यात आला.

खासदारांना निलंबन करणं चांगली गोष्ट आहे का? देशाच्या इतिहासात अशा पद्धतीचं निलंबन झालं नव्हतं. प्रश्न विचारण्यात येत असल्याने खासदारांचं निलंबन करण्यात आलं, असं राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार म्हणाले. खासदार वंदना चव्हाण यावेळी म्हणाल्या की, वादग्रस्त विधेयके संसदेत मंजूर करायचे असल्यानेच खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: मुख्यमंत्र्यांची सभा झालेल्या खुलताबादमध्ये काँग्रेसने खातं उघडलं तर फुलंब्रीमध्ये ठाकरे गटाचा विजय

Nagar Parishad Election Result : शिरोळमध्ये विद्यमान आमदारांना तगडा झटका, यड्रावकर–माने गटाची सत्ता संपुष्टात, मुरगूड–कागल–गडहिंग्लजमध्ये आघाड्यांचे वर्चस्व

Kolhapur Local Body Election : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील निकाल स्पष्ट; मुरगूडमध्ये मुश्रीफ गटाला धक्का, हातकणंगलेत काँग्रेसचा वरचष्मा

Ex Agniveer BSF Recruitment : मोदी सरकारचा मोठा निर्णय! माजी अग्निवीरांना 'बीएसएफ कॉन्स्टेबल' भरतीत ५० टक्के कोटा निश्चित

Viral Video : धक्कादायक ! धावत्या नमो भारत एक्सप्रेसमध्ये जोडप्याने ठेवले शरीरसंबंध, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT