congress president sonia gandhi discharged from hospital faces questioning in alleged money laundering case
congress president sonia gandhi discharged from hospital faces questioning in alleged money laundering case  Sonia Gandhi
देश

सोनिया गांधींना रुग्णालयातून डिस्चार्ज; लवकरच ED कडून होऊ शकते चौकशी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना संबंधित समस्यांमुळे त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.75 वर्षीय सोनिया गांधी यांना 2 जून रोजी कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले. त्यांना COVID-19 नंतरच्या गुंतागुंतीमुळे 12 जून रोजी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (congress president sonia gandhi discharged from hospital faces questioning in alleged money laundering case)

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट केले की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सर गंगाराम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना घरी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नॅशनल हेराल्डशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात 23 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी अंमलबजावणी संचालनालय (ED) ने सोनिया गांधी यांना नवीन समन्स जारी केले आहेत. सोनियांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असला तरी चौकशीसाठी त्या ईडीसमोर हजर होतील का याबद्दल साशंकता आहे.

सोनिया गांधी यांना यापूर्वी 8 जून रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले होते, परंतु त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे त्यांना तपास यंत्रणेसमोर हजर राहण्यासाठी नवीन तारीख देण्यास सांगण्यात आली होती. ईडीने आधीपासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चौकशी करत असून ते आज ईडीसमोर हजर झाले आहेत.

नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस चौकशी केल्यानंतर सोनिया गांधींव्यतिरिक्त, त्यांचा मुलगा राहुल गांधी हे सोमवारी पुन्हा अंमलबजावणी संचालनालय (ED) कार्यालयात हजर झाले. 52 वर्षीय राहुल गांधी यांची गेल्या आठवड्यात सोमवार, मंगळवार आणि बुधवारी सलग तीन दिवस ईडीच्या अधिकाऱ्यांनी 30 तासांहून अधिक काळ चौकशी केली होती, ज्यादरम्यान मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) त्यांचे जबाब नोंदवण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT