Congress President Sonia Gandhi Haryana state president Kumari Shailja and Abhishek Manu Singhvi promoted executive members  sakal
देश

कुमारी शैलजा, सिंघवी कार्यकारिणीत

पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडून पक्षसंघटनेत फेरबदल

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : कोविडवरील उपचारानंतर रुग्णालयातून बाहेर आलेल्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षसंघटनेत फेरबदल केला आहे. हरियानाच्या माजी प्रदेशाध्यक्षा कुमारी शैलजा आणि विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांना कार्यकारिणी सदस्यपदी बढती देण्यात आली आहे. सिंघवी ईडीच्या (सक्तवसुली संचालनालय) चौकशीप्रकरणी न्यायालयात काँग्रेस नेतृत्वाची बाजू मांडतात. काँग्रेसमधील निर्णय प्रक्रियेत कार्यकारिणीचे स्थान पक्षाध्यक्षांच्या खालोखाल मानले जाते. आंध्र प्रदेशातील नेते टी. सुब्बरामी रेड्डी यांना कायम निमंत्रित सदस्य, तर उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष अजयकुमार लल्लू यांना विशेष निमंत्रितपदी स्थान देण्याचाही निर्णय सोनिया यांनी घेतला आहे. संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी या नियुक्त्यांची घोषणा केली.

हरियानातील दलित महिला नेत्या असलेल्या कुमारी शैलजा यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता असताना पक्षांतर्गत घडामोडींमुळे त्यांची संधी हुकली होती. आता कार्यकारिणीवर त्यांची निवड करून पक्ष नेतृत्वाने वेगळा संदेश दिल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे पक्ष संघटनेच्या कामकाजाचा काहीही अनुभव नसलेल्या सिंघवी यांची कार्यकारिणीवरील निवड ही महत्त्वाच्या न्यायालयीन खटल्यात काँग्रेसची आणि पक्षनेतृत्वाची बाजू मांडण्याचे बक्षीस असल्याचे मानले जात आहे. आतापर्यंत काँग्रेसच्या महत्त्वाच्या खटल्यांमध्ये सिंघवींसह ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांचाही समावेश असे. मात्र, अलीकडेच सिब्बल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने सिंघवी यांना ही संधी मिळाली आहे. अशाच प्रकारे संघटनेचा अनुभव नसलेले जयराम रमेश यांची सोनिया यांनी पक्षाच्या सरचिटणीसपदी आणि संपूर्ण माध्यम विभागाच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपविली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Sonawane : पुस्तकी ज्ञानापलीकडची शाळा! अशोक सोनवणे गुरुजींनी घडविले ३००० हून अधिक बालकलाकार

Satara News: पत्नीच्या डिलिव्हरीसाठी येताच काळाचा घाला, ८ तासांची चिमुकली पित्याच्या अंत्यदर्शनासाठी | Sakal News

Pune News: इमारतीवरून तोल गेल्याने मुलाचा मृत्यू; पतंग उडविताना कात्रजमध्ये घटना, बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा!

Solapur University: शॉकिंग अपडेट! पुण्यश्लोक होळकर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना उच्च रक्तदाब; संशोधनातील आकडे पाहून थक्क व्हाल

Crime News : नोटाबंदीनंतरही ४०० कोटींच्या जुन्या नोटा? घोटी पोलीस तपासात धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT