Sonia Gandhi And Rahul Gandhi  sakal
देश

सोनिया गांधींसाठी काँग्रेस करणार सत्याग्रह; हे तर नकली गांधी, भाजपची टीका

सोनिया, राहुल गांधींसाठी काँग्रेसचा सत्याग्रह

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली : नॅशनल हेराॅल्ड प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना उद्या सोमवारी (ता.१२) ईडीने चौकशीसाठी बोलवले आहे. याच दिवशी काँग्रेसने देशभरात निदर्शने करुन ताकद दाखवण्याचे नियोजन केले आहे. काँग्रेस नेता मनिकम टागोर म्हणाले, तापस संस्थेच्या २५ कार्यालयांबाहेर काँग्रेस नेते निदर्शने करणार आहेत. काँग्रेसचा आरोप आहे, की सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सापळ्यात अडकवले जात आहे. भाजपनेही काँग्रेसवर पलटवार करत म्हटले, की राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे दोघेही जामिनावर बाहेर आहेत. (Congress Protest Against Enforcement Directorate For Summon To Sonia And Rahul Gandhi)

उद्या राहुल गांधी यांना ईडीसमोर सादर व्हायचे आहे. यापूर्वीच काँग्रेस (Congress Party) नाटक करत आहे. पक्षाने आपल्या सर्वच नेत्यांना दिल्लीला बोलवत आहे. या नाटकाचा अर्थ काय? भाजपचे (BJP) राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा म्हणाले, जर दिग्विजय सिंहसारखा नेता पत्रकार परिषद घेतात तर त्याचा काय अर्थ आहे? तुम्ही पत्रकार परिषद करुन नाटक काय करत आहे? ईडीसमोर स्वतः निर्दोषत्व सिद्ध करा. सत्याग्रह काय असते? या नकली गांधींकडून नकली सत्याग्रहाला पाहून गांधीजींनाही शर्म वाटली असती. राहुल गांधी यांनी कायद्याचे उल्लंघन करु नये. कारण हे राजकारण नाही, असे पात्रा म्हणाले.

राहुल गांधींना २ जून रोजी चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. मात्र त्यांनी दुसरी तारीख मागितली होती. कारण ते त्यावेळी देशाबाहेर होते. दुसरीकडे सोनिया गांधी यांना ८ जून रोजी बोलवण्यात आले होते. मात्र कोरोनामुळे त्यांचीही तारीख पुढे ढकलण्यात आली असून सोनिया गांधी यांना २३ जूनची तारीख देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

Shivaji Maharaj: मुंबई पोलिसांच्या लाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा

Ganesh Festival 2025 : खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या; पूजा आणि सजावटीच्या साहित्यासाठी पुणेकरांची लगबग

SCROLL FOR NEXT