Maneka Gandhi  
देश

राहुल की वरुण, कोण जास्त बुद्धिवान? मनेका गांधी यांनी स्पष्ट सांगून टाकलं

Maneka Gandhi answer on Varun Gandhi: मनेका गांधी यांना त्यांचे पुत्र वरुण गांधी आणि भाचे राहुल गांधी यांच्यातील फरकाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- उत्तर प्रदेशच्या सुल्तानपूर लोकसभा मतदारसंघातून मनेका गांधी या भाजपच्या उमेदवार आहेत. मनेका गांधी यांना त्यांचे पुत्र वरुण गांधी आणि भाचे राहुल गांधी यांच्यातील फरकाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यासंदर्भात त्यांनी उत्तर दिलं आहे. वरुण गांधी यांच्यामध्ये बुद्धिमत्ता जास्त आहे, असं त्या म्हणाल्या

राहुल गांधी आणि वरुण गांधी यांची अनेकदा तुलना केली जाते. राहुल गांधी यांच्यापेक्षा वरुण गांधी यांच्यामध्ये जास्त हुशारी असल्याची चर्चा आहे असा प्रश्न मनेका गांधी यांना विचारण्यात आला. तसेच, राहुल गांधी सध्या ज्या ठिकाणी आहेत, त्याठिकाणी वरुण गांधी असते तर काय झालं असतं? असं त्यांना विचारण्यात आलं होतं.

मनेका गांधी यावर म्हणाल्या की, 'या जर-तरच्या गोष्टींना काही अर्थ नसतो. वरुण गांधी यांची बुद्धिमत्ता जास्त आहे. पण, कोणी एखाद्याचे नशीब तर बदलू शकत नाही. अशा परिस्थितीत जे आहे ते ठीक आहे असं म्हणावं लागेल.'

मोदीच होणार तिसऱ्यांदा पंतप्रधान?

मनेका गांधी यांनी नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. भाजपच्या नेतृत्त्वातील लोकशाही आघाडीला बहुमत मिळताना दिसत आहे. त्यामुळे मोदीच पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेतील, असं त्या म्हणाल्या.

मनेका गांधी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका देखील केली. राहुल गांधी म्हणतात सत्तेत आल्यास महिलांच्या खात्यामध्ये खटाखट पैसे येतील. पण, पैसे कुठून येतील. अशा घोषणांना आम्ही शेखचिल्ली म्हणतो, असं त्या म्हणाल्या.

देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होत आहे. त्यातील पाच टप्पे पार पडले आहेत. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात हे पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे. दरम्यान, मनेका गांधी यांचे पुत्र वरुण गांधी यांचे यंदा भाजपकडून तिकीट कापण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देश चालवावा का? सरन्यायाधीशांना कशामुळे राग आला, म्हणाले, "ही याचिका शॉपिंग मॉलसारखी"

Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: गॅस टंचाईची भीती; संभाजीनगरमध्ये सिलिंडरसाठी १० दिवसांची वेटिंग; डबल सिलिंडर असलेले ग्राहकही आगाऊ बुकिंगकडे

Pi Day 2026: 'या' कारणामुळे 14 मार्चला साजरा केला जातो 'पाय डे'! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि काही रंजक गोष्टी

Chhatrapati Sambhajinagar News: गॅससाठी जनतेच्या रांगा, पण पथकांना काळाबाजार दिसतच नाही! छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस गोंधळ

नवीन लॉ कॉलेजच्या मान्यतेसाठी १४ नवे नियम! बार कौन्सिल ऑफ इंडियाचे गॅझेट प्रसिद्ध; इतक्या किलोमीटर अंतराची अट अन्‌ गरज पाहूनच मान्यता, वाचा...

SCROLL FOR NEXT