Bharat Jodo Yatra Rahul Gandhi Raghuram Rajan  esakal
देश

Rahul Gandhi : "जनता काय समजायचं ते समजली"; रघुराम राजन यांच्या कौतुकानंतर भाजपा नेत्याचा टोला

राहुल गांधी पप्पू नाही, असं माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले होते.

सकाळ डिजिटल टीम

Rahul Gandhi News: राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला हजेरी लावल्यानंतर रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राहुल गांधी पप्पू नाही, असं विधान राजन यांनी केलं आहे. त्यावरुन आता भाजपा नेत्याने त्यांना टोला लगावला आहे.

भाजपा आमदार अतुल भातखळकर आपल्या ट्वीट्सच्या माध्यमातून सातत्याने विरोधकांवर टीका करत असतात. त्यांनी रघुराम राजन यांच्या याच विधानाचा समाचार घेतला आहे.

आपल्या ट्वीटमध्ये भातखळकर म्हणतात, "राहुल गांधी पप्पू नाही हे प्रमाणपत्र रघुराम राजन यांना द्यावे लागते यातच काय ते कळते. अजून चार साक्षीदार उभे करा पण जनता काय समजायचं ते समजून चुकली आहे."

हेही वाचा - शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

काय म्हणाले होते रघुराम राजन?

"राहुल गांधींची पप्पू ही प्रतिमा खूपच दुर्दैवी आहे. त्यांच्याशी अनेक आघाड्यांवर संवाद साधण्यात मी जवळपास एक दशक घालवलं आहे. ते कोणत्याही अर्थानं मला पप्पू वाटत नाहीत.

राहुल एक हुशार, तरुण आि जिज्ञासू व्यक्ती आहे." राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाल्यानंतर त्या दरम्यान रघुराम राजन यांनी हे विधान केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Protest: सोशल मीडियावरील बंदीवरून नेपाळ ढवळून निघाला; भारताने नागरिकांना सतर्कतेचा सल्ला दिला, सांगितलं...

महाराष्ट्राच्या Shivam Lohakare ने मोडला 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राचा विक्रम; पण, होणार नाही अधिकृत नोंद, कारण...

Pune News : विसर्जन मिरवणुकीत हायटेक पोलिसिंग; चेहरा ओळख तंत्रज्ञानाचा अचूक वापर; सराईत गुन्हेगारांवर चाप

Shivaji Maharaj: इतिहासातील गुपित! छत्रपती शिवाजी महाराजांनी बोटं छाटल्यानंतर शाहिस्तेखान कुठं पळाला? पुढं कधीच परतला नाही

Thane Crime: सोनसाखळी चोरणारी आंतरराज्य टोळी गजाआड, तीन सराईत गुंडांना अटक

SCROLL FOR NEXT