congress rahul gandhi helping girl to wear sandal bharat jodo yatra in kerala video viral  
देश

राहुल गांधींची चिमुरडीला चप्पल घालायला मदत, भारत जोडो यात्रेचा Video Viral

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाचे इतर अनेक सदस्य ‘भारत जोडो यात्रेवर आहेत. यात्रेदरम्यान काँग्रेस नेते लोकांशी संवाद साधत देशातील अनेक भागांमध्ये रॅली काढत आहेत. भारत जोडोल यात्रा, सध्या केरळमध्ये दाखल झाली आहे.राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्रा रविवारी केरळमधील हरिपद येथून पुन्हा सुरू झाली, ज्यात पक्षाचे शेकडो कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते. सकाळी 6.30 नंतर सुरू झालेल्या यात्रेचा 11वा दिवस सुरू आहे, दरम्यान, राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते एका मुलीला सँडल घालण्यास मदत करताना दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये काय आहे?

हा व्हिडिओ अलप्पुझा जिल्ह्यातील अंबालापुझा शहरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. राहुल गांधी इतर पक्षाच्या नेत्यांसोबत रस्त्यावर चालताना दिसत आहेत. एक माणूस एका लहान मुलीचा हात धरून त्यांच्या थोडे पुढे चालत आहे. राहुल गांधी तिला आवाज देऊन थांबवतात आणि मुलीची चप्पल निघाली असल्याची माहिती देतात. यानंतर ते स्वतः मुलीला व्यवस्थित चप्पल घालू लागतात. राहूल गांधी यांंनी स्वतः खाली वाकून त्या मुलीला चप्पल घालण्यात मदत केली. दरम्यान राहुल गांधींच्या या वागणूकीचे सध्या सोशल मीडिया यूजर्सनी खूप कौतुक केले आहे. राहुल गांधींचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आतापर्यंत हजारो लोकांनी तो पाहिला आहे. राहुल गांधींच्या कृतीने अनेक लोकांची मने जिंकली आहेत.

कॉंग्रेसची ही भारत जोडो यात्रा 150 दिवसात पूर्ण होणार आहे. 7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून पदयात्रा सुरू झाली आणि ती जम्मू-काश्मीरमध्ये संपेल.10 सप्टेंबरच्या संध्याकाळी केरळमध्ये दाखल झालेली भारत जोडो यात्रा 1 ऑक्टोबरला कर्नाटकात प्रवेश करण्यापूर्वी 19 दिवसांच्या कालावधीत राज्याच्या (केरळ) विविध भागांतून (केरळ) 450 किमीचे अंतर सात जिल्ह्यांमधून पार करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात संतापजनक घटना! धावत्या कारमध्ये वकील महिलेवर अत्याचार, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : रत्नागिरीत पेट्रोल-डिझेल सोबत आता CNG चा तुटवडा

पायात काटा घुसला आणि संवेदना गायब, देऊळ बंद 2 च्या शूटिंग दरम्यान 4 महिने बेडरेस्टवर होते मोहन जोशी

Vaibhav Sooryavanshi चे वय विसरा, त्याला थेट टीम इंडियात घ्या.... रवी शास्त्रींची BCCI कडे थेट मागणी

Pune Metro Construction: सातारा रस्त्यावरील बसथांब्यांमुळे गोंधळ; मेट्रोच्या कामामुळे थांबे बंद, नियोजन करण्याची प्रवाशांची मागणी!

SCROLL FOR NEXT