rahul gandhi news esakal
देश

Rahul Gandhi News : राहुल गांधी आज संसदेत परतणार? सर्वांच्या नजरा लोकसभा अध्यक्षांवर

रोहित कणसे

मोदी आडनाव बदनामी प्रकरणात राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा झाली आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी गमवावी लागली. आता सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधीच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर त्यांची संसदेतील सदस्यत्व बहाल करण्यासाठीचे कागदपत्र तयार असून यावर फक्त लोकसभा अध्यक्षांची सही होणे बाकी आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोमवारी लोकसभा अध्यक्ष या कागदपत्रांवर हस्ताक्षर करू शकतात. तसेच या प्रक्रियेला उशीर झाल्यास याविरोधात काँग्रेस पक्ष न्यायालयात दाद मागू शकते. इतकेच नाही तर विरोधक आघाडी हा मुद्दा संसदेत देखील उपस्थित करू शकते. याच पार्श्वभूमिवर काँग्रेस हायकमांडने आज सर्व खासदारांची बैठक देखील बोलवली आहे.

दरम्यान यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लक्षद्वीपचे खासदार पीपी मोहम्मद फैजल यांचे संसदेतील सदस्यत्व बहाल करण्यासाठी एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागला होता. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावाची बदनामी करणारे वक्तव्य केल्यावरून राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. यानंतर राहुल गांधी यांना अपात्र घोषीत करण्यात आलं. २०१९ साली निवडणूक प्रचारादरम्यान कर्नाटकमधील कोलार येथील सभेत राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं होतं. सर्व चोरांचे आडनाव मोदी कसं असंत? असा प्रश्न त्यांनी सभेत विचारला होता.

शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती देताना राहुल गांधी यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्याचं कोणतही कारण ट्रायल कोर्टाच्या न्यायाधीशांनी दिलं नसल्याचे म्हटले होते. अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. न्यायाधीश म्हणाले की, संसदेतील सदस्यत्व रद्द केल्याचा प्रभाव फक्त एका व्यक्तीच्या अधिकारांवर पडत नाही तर तो मतदारांना देखील प्रभावित करतो.

दरम्यान आज काँग्रेस हायकमांडने पक्षाच्या खासदारांची बैठकही बोलावली आहे, ज्यामध्ये राहुल गांधींचे सदस्यत्व बहाल करण्याच्या मागणीवर चर्चा होऊ शकते. पक्षाच्या संसदीय कार्यालयात सकाळी 10.30 वाजता ही बैठक होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT